पाकिस्तानकडून मिळवणार अणुबाँब - ISIS चा दावा

By Admin | Updated: May 23, 2015 15:17 IST2015-05-23T14:43:46+5:302015-05-23T15:17:56+5:30

इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना येत्या काळात पाकिस्तानकडून अणुबाँब विकत घेऊ शकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

The atomic bomb from Pakistan - ISIS claims | पाकिस्तानकडून मिळवणार अणुबाँब - ISIS चा दावा

पाकिस्तानकडून मिळवणार अणुबाँब - ISIS चा दावा

>ऑनलाइन लोकमत
इराक, दि. २३ - गेल्या वर्षभरात इराक व सीरियामधला मोठा प्रांत अमलाखाली आणणारी इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना येत्या काळात पाकिस्तानकडून अणुबाँब विकत घेऊ शकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इसिसच्या प्रचारासाठी वापरण्यात येणा-या दाबिक या मासिकातच अशी शक्यता वर्तवण्यात आली असून, पाकिस्तानातल्या भ्रष्टाचारी लष्करी अधिका-यांना व इसिसशी बांधिलकी असलेल्यांना हाताशी धरून अणुबाँब मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे इसिसने नमूद केले आहे.
गेल्या वर्षभरात इसिसने इराक व सीरियामधली अनेक शहरे ताब्यात घेतली असून अब्जावधी रुपये मिळवून देणा-या तेलखाणींवरही कब्जा मिळवला आहे. त्यामुळे पैशाची चणचण नसलेल्या इसिसच्या आकांक्षा विस्तारल्या असून बोको हरामसारख्या अनेक दहशतवादी संघटनाही इसिसच्या छत्राखाली आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. याआधी झालेले हल्ले किरकोळ वाटावे असा जबरदस्त दणका अमेरिकेला देण्याचा विचार इसिसने जाहीर केला असून अणुबाँब किंवा अत्यंत घातक अशा स्फोटकांचा वापर अमेरिकेविरोधात करण्याचे संकेत इसिसने दिले आहेत. आफ्रिका, मध्य आशिया व पाकिस्तानपर्यंत इसिसचं जाळं विस्तारल्याचे दिसत असून या दहशतवादी संघटनेची पुढची झेप अणुबाँब असल्याने व त्यातही पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज असल्याने ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: The atomic bomb from Pakistan - ISIS claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.