अॅथलीट ऑस्कर पिस्टोरीयस हत्येच्या गुन्हा प्रकरणात दोषी
By Admin | Updated: December 3, 2015 15:03 IST2015-12-03T14:57:05+5:302015-12-03T15:03:46+5:30
दक्षिण आफ्रिकेचा अॅथलीट ऑस्कर पिस्टोरीयसला सर्वोच्च न्यायालयाने हत्येच्या गुन्हया प्रकरणी दोषी ठरवले आहे.

अॅथलीट ऑस्कर पिस्टोरीयस हत्येच्या गुन्हा प्रकरणात दोषी
ऑनलाईन लोकमत
डरबन, दि. ३ - ब्लेड रनर म्हणून प्रसिध्द असलेला दक्षिण आफ्रिकेचा अॅथलीट ऑस्कर पिस्टोरीयसला सर्वोच्च न्यायालयाने हत्येच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवले आहे.
प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्पच्या हत्या प्रकरणात ऑस्करला कनिष्ठ न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले होते.
न्यायालयाने त्याला पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेला सरकारी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. २०१३ मध्ये व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी रिव्हाची हत्या झाली होती.