शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

AstraZeneca Corona Vaccine: फ्रान्स, जर्मनीसह डझनावर देशांनी अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीचे लसीकरण थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 07:53 IST

AstraZeneca Corona Vaccination halted: कोरोना महामारीला रोखण्यासाठी अनेक देश ब्रिटनची मोठी कंपनी अ‍ॅस्ट्राझिनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर करत आहेत. भारतातही पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझिनेकाने विकसित केलेली कोरोना लस बनविते. भारतातही य़ा लसीचे लसीकरण मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. 

गेल्या आठवडाभरापासून युरोपमधील जवळपास डझनावर देशांनी ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या  (AstraZeneca Corona Vaccination) कोरोना लसीचे लसीकरण थांबवले आहे. यामध्ये फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इटलीसारख्या देशांचा समावेश आहे. कारण डेन्मार्क, नॉर्वेमध्ये ही लस घेतल्यानंतर काही लोकांच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी (blood clots) झाल्या आहेत. यामुळे काहींचे मृत्यूही झाले आहेत. अद्याप लसीमुळे असे होत असल्याचे समोर आलेले नसले तरीही या देशांनी लसीकरण थांबविण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. (France, Spain. Germany suspends use of AstraZeneca vaccine)

युरोपच्या देशांसह आफ्रिकेच्या कांगो, आशियातील थायलंड या देशांनीदेखील ही लस रद्द केली आहे. तसेच ब्राझीलने फायझर कंपनीचे 10 कोटी डोस मागविले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस देणे थांबवत असल्याचे घोषणा केली. युरोपीय मेडिसीन एजन्सी जोपर्यंत ही लस सुरक्षित असल्याचे सांगत नाही तोपर्यंत लसीकरण थांबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. 

कोरोना महामारीला रोखण्यासाठी अनेक देश ब्रिटनची मोठी कंपनी अ‍ॅस्ट्राझिनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर (AstraZeneca Corona Vaccination ) करत आहेत. भारतातही पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझिनेकाने विकसित केलेली कोरोना लस बनविते. भारतातही य़ा लसीचे लसीकरण मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. 

डेन्मार्क, इटली आणि नॉर्वेसह सहा देशांमधील काही नागरिकांच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनू लागल्याचे समोर आले आहे. यामुळे या देशांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला असून या लसीच्या परिणामांवर चौकशी सुरु केली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने सध्यातरी याबाबत कोणतेही संकेत सापडलेले नाहीत. अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस घेतल्यानंतर अशा प्रकारची हालत होत असल्याचे स्पष्ट झालेले नाहीय, असे म्हटले आहे. 

डेन्मार्कच्या हेल्थ अथॉरिटीने सांगितले की,  हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीय. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचा तपास सुरु आहे. याआधी ऑस्ट्रियामध्ये 49 वर्षांच्या नर्सचा कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याने या देशाने अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस वापरणे बंद केले आहे. या नर्सचा मृत्यू तिच्या रक्तात गाठी तयार झाल्याने झाला होता. 

17 हून अधिक देशांना पुरवठाचार आणखी युरोपिय देश एस्टोनिया, लातविया, लिथुआनिया व लक्जमबर्ग या देशांनीही कोरोना लसीकरण थांबविले आहे. 17 युरोपीय देशांपैकी 10 देशांना कोरोना लसीचा डोस पाठविण्यात आला आहे. डेन्मार्कच्या हेल्थ अथॉरिटीचे संचालक सोरेन ब्रोसट्रॉम यांनी सांगितले की, आम्ही अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस वापरण्यास नकार दिला नसून तात्पुरत्या स्वरुपात वापर थांबविला आहे. आमच्याकडे लस घेतल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसFranceफ्रान्स