पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर याने फील्ड मार्शलपदी निवड निवड झाल्यानंतर रविवारी एका उच्चस्तरीय डिनरचे आयोजन केले होते. पंतप्रधान शाहबाज शरीफांपासून ते राष्ट्रपती आसिफ अली झरदारी अन् बिलावल भुट्टोसह राजकारण आणि लष्करातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी या डिनर पार्टीला उपस्थित होते. दरम्यान, असीम मुनीरने पंतप्रधानांना भेट स्वरुपात दिलेला फोटो चर्चेचा अन् वादाचा विषय बनला आहे.
असीम मुनीरने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना दिलेल्या फोटोबाबत पाकिस्तानकडून दावा केला जातोय की, हा फोटो पाक सैन्याने अलिकडेच भारतावर केलेल्या हल्ल्याचा आहे. पण, प्रत्यक्षात हा फोटो पाच वर्षे जुना फोटो चिनी सैन्याचा आहे. पण, मुनीरने हा फोटो भारतावर हल्ल्याच असल्याचे सांगून चक्क पंतप्रधानांना भेट केला. आता यावरुन मुनीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
कधीचा आहे हा फोटो?
हा फोटो 18 ऑगस्ट 2018 चा आहे. चिनी आर्मी पीएलएच्या 74 व्या ग्रुप अंतर्गत PHL-03 लॉन्ग रेंज रॉकेट सिस्टीमद्वारे अनेक रॉकेट डागण्यात आले. त्याच चीनी लष्करी कारवाईचा हा फोटो आहे.
ऑपरेशन सिंदूरपाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने 7 मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले. त्यानंतर पाकिस्तानने संघर्ष आणखी वाढवला अन् भारतातील अनेक शहरांमधील लष्करी आणि निवासी क्षेत्रांना ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले आहे. पण, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. त्यानंतर 10 मे रोजी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली.