म्युनिच (जर्मनी): आपल्या देशात 'सुपर पॉवर' मानले जाणारे आणि सरकार ज्यांच्या इशाऱ्यावर चालते, त्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांना जर्मनीमध्ये एका अत्यंत मानहानीकारक प्रसंगाला सामोरे जावे लागले. म्युनिच सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुनीर यांना सुरक्षा रक्षकांनी ओळखपत्रासाठी गेटवरच रोखले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जर्मनीमध्ये आयोजित जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित 'म्युनिच सुरक्षा परिषदे'मध्ये जनरल आसिम मुनीर हे पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पोहोचले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करताना तिथल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांनी त्यांना ओळखले नाही. इतकेच नाही, तर प्रोटोकॉलनुसार त्यांना आत सोडण्यापूर्वी सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली.
सोशल मीडियावर पाकिस्तानची नाचक्कीया घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानची जगभरात मोठी नाचक्की होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, सुरक्षा रक्षक मुनीर यांना थांबवून काही विचारत आहेत. पाकिस्तानात ज्यांच्या शब्दाला सर्वोच्च मान दिला जातो, त्यांना परदेशात साध्या सुरक्षा रक्षकासमोर ओळख सिद्ध करावी लागल्याने नेटिझन्स पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत.
दुसऱ्यांदा घडला असा प्रकार?आसिम मुनीर यांच्यासोबत अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. यापूर्वीही लंडनमध्ये मुनीर यांच्याविरुद्ध निदर्शने झाली होती. जर्मनीतील या घटनेमुळे पाकिस्तानच्या लष्करी मुत्सद्देगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जागतिक स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा किती खालावली आहे, याचीच ही प्रचिती असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Web Summary : Pakistan's Army Chief Asim Munir was stopped at the Munich Security Conference gate for ID. This incident sparked criticism and highlighted Pakistan's declining global image, raising questions about its military diplomacy after previous protests in London.
Web Summary : म्यूनिख सुरक्षा सम्मेलन में पाकिस्तानी सेना प्रमुख आसिम मुनीर को आईडी के लिए गेट पर रोका गया। इस घटना से पाकिस्तान की वैश्विक छवि पर सवाल उठे और सैन्य कूटनीति पर आलोचना हुई। लंदन में पहले भी विरोध प्रदर्शन हुए थे।