शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्हाला स्वीकारार्ह नाही- चीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 17:23 IST

भारताचं अभिन्न अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्ही कधीही स्वीकारलेलं नाही. तसेच अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, असं विधान चीननं केलं आहे. 

बीजिंग- डोकलाम वादानंतर आता भारत आणि चीनमध्ये अरुणाचल प्रदेश हे पुढच्या मोठ्या वादाचं कारण ठरू शकतं. भारताचं अभिन्न अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्ही कधीही स्वीकारलेलं नाही. तसेच अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, असं विधान चीननं केलं आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री गेंग शुआंग यांनी अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरीनंतर ही प्रतिक्रिया दिली आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये पीपल लिबरेशन आर्मीच्या सैन्यानं घुसखोरी केली होती. त्यावर चीन बोलायला तयार नाही. मीडिया रिपोर्टनुसार, चिनी सैनिक भारताच्या अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात 200 मीटरपर्यंत आत घुसले होते. या घटनेनंतर गेंग शुआंग म्हणाले, सीमेच्या वादावर आमची भूमिका नेहमी स्पष्ट असते. आम्ही कधीही अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व स्वीकारलेलं नाही. परंतु तुम्ही ज्याबाबत बोलत आहात, त्याची मला काही माहिती नाही. अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीन करतो आहे. चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा 3 हजार 488 किमी लांब आहे. या रेषेबाबतचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांनी आतापर्यंत विशेष प्रतिनिधींच्या माध्यमातून 19 फेऱ्यांतील चर्चा झाली आहे. चिनी सैनिकांनी शस्त्रास्त्रांसह गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय लष्करानं यांचा हा प्रयत्न हाणून पाडला होता.चीन आणि भारताच्या सीमेसंबंधी वाद सोडवण्यासाठी एक चांगल्या प्रकारची प्रणाली विकसित आहे. या प्रणालीअंतर्गत चीन आणि भारत सीमा वादाशी संबंधित प्रकरणं सोडवू शकतो. सीमेवर शांतता प्रस्थापित करणं हे चीन आणि भारत दोघांसाठीही गरजेचं आहे, असंही गेंग शुआंग म्हणाले आहेत. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतो. तसेच भारतीय अधिकाऱ्यांकडून या प्रदेशावरील अधिकाराबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांवर चीनकडून सातत्याने सातत्याने विरोध करण्यात येतो. दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन महिन्यांपूर्वी सिक्कीममधील भारत आणि चीन सीमेजवळील नथू ला भागाचा दौरा केला होता. त्यावेळी सीतारामन यांनी सीमेपलिकडे उभ्या असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांची भेटही घेतली होती.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीनIndiaभारत