शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 09:24 IST

जगात प्रत्येकालाच आपली संस्कृती फार प्यारी असते. त्यामुळे ही संस्कृती मोडीत निघू नये, आपल्या उच्च प्रथा, परंपरा जपल्या जाव्यात, असं प्रत्येकालाच वाटत असतं.

जगात प्रत्येकालाच आपली संस्कृती फार प्यारी असते. त्यामुळे ही संस्कृती मोडीत निघू नये, आपल्या उच्च प्रथा, परंपरा जपल्या जाव्यात, असं प्रत्येकालाच वाटत असतं. पाश्चात्त्यांनी तर आपल्या संस्कृतीचं पार वाटोळंच केलं आहे, त्यामुळे त्याविरुद्ध काहीतरी केलं पाहिजे, असा उमाळा दर काही वर्षांनी जगातील सगळ्याच ठिकाणी संस्कृतिरक्षकांना येत असतो.  

पण आपली ही उच्च संस्कृती बाटली म्हणजे काय आणि ती पुन्हा रुळांवर आणायची तर काय करायचं, यासाठीचे मापदंडही जगभरात जवळपास सारखेच आहेत! ते म्हणजे महिलांना अधिक बंधनात आणणं, त्यांचं बाहेर हिंडणं-फिरणं बंद करायचं, त्यांना घरात काेंडून घालायचं आणि डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण अंगभर कपडे त्यांना घालायला लावायचे. एवढं केलं म्हणजे संस्कृती टिकली आणि टिकवल्याचे गोडवे मग मोठ्या आवाजात गाता येतात!

सीरियामध्येही आता ‘संस्कृतिरक्षणाचं कार्य’ मोठ्या जोमात हाती घेण्यात आलं आहे. सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना सत्तेतून पायउतार केल्यानंतर अहमद अल शरा यांनी सत्ता काबीज केली आहे. सत्तेवर येताच त्यांनाही मागच्या सरकारनं संस्कृतीचे कसे तीन-तेरा वाजवले आहेत, हे नव्यानं उमगलं आहे. आपल्या देशाच्या घरंदाज संस्कृतीला जो मोडता घालेल, त्याला कठोर शासन केलं जाईल, असं म्हणत त्यांनी देशात नवा ड्रेस कोड जारी केला आहे. अर्थातच हा ड्रेस कोड प्रामुख्यानं महिलांसाठी आहे. त्यामुळे त्यांना आता ‘बुर्किनी’ घातल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही. बुर्किनी म्हणजे थोडक्यात काय, तर संपूर्ण शरीर झाकलेले अंगभर कपडे! त्यामुळे महिलांना आता समुद्रकिनारीही अंगभर कपडे घालावे लागतील. नुसतं किनाऱ्यावरच नाही, तर समुद्रात किनाऱ्यावरच्या पाण्यात खेळायचं असेल, पाण्यात थोडीशी डुबकी मारायची असेल तरीही शरीर पूर्ण झाकणारा पोशाखच महिलांना परिधान करावा लागेल. 

पर्यटनमंत्री माजेन अल-सल्हानी यांनी या संदर्भात फेसबुकवर नुकत्याच लिहिलेल्या पोस्टमध्ये  म्हटलं आहे, समुद्रकिनारे, सार्वजनिक ठिकाणी एवढंच नाही, तर स्विमिंग पूलवरही महिलांना आता विशिष्ट ‘स्विमवेअर’ घालावा लागेल. अर्थातच हा स्विमवेअर महिलांच्या मर्यादांचं भान राखणारा असेल आणि समजातील सर्वच वर्गांतील भावनांचा आदर करणारा असेल. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि आपल्या उच्च प्रथा-परंपरा-संस्कृतीचं त्यामुळे उल्लंघन होणार नाही, याची काळजी महिलांना घ्यावी लागेल. 

त्यामुळे आता महिलांना कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना खांदे झाकलेला आणि गुडघ्यांच्या खाली आलेला पोशाखच परिधान करावा लागेल. अंगात घातलेले कपडेही फार घट्ट चालणार नाहीत. शिवाय ते पारदर्शक तर असताच कामा नयेत. ढिले कपडे घालावे लागतील. सार्वजनिक हित आणि देशाची संस्कृती लक्षात घेऊन हे नवे नियम तयार करण्यात आले आहेत, असं सरकारचं म्हणणं आहे. अर्थात सरकारनं काही सन्मान्य अपवादही केले आहेत. फोर स्टार किंवा त्यावरचं रेटिंग असणारी आंतरराष्ट्रीय हॉटेल्स आणि प्रीमियम रिसॉर्टस्ना हा नियम लागू नसेल. खासगी समुद्रकिनारे आणि स्विमिंग पूल्सवर ‘वेस्टर्न स्विमवेअर’ला मुभा असेल! नाही म्हणायला पुरुषांनाही सार्वजनिक ठिकाणी विनाशर्ट वावरता येणार नाही!

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयFarmerशेतकरी