आर्थर अश्किन, जेरार्ड मॉरो, डोना स्ट्रीक्लन्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 06:59 PM2018-10-02T18:59:59+5:302018-10-02T19:06:56+5:30

लेझर तंत्रज्ञानातील संशोधनाबद्दल तिघांचा गौरव होणार

arthur ashkin gerard mourou donna strickland Win 2018 Nobel Prize In Physics For Laser Inventions | आर्थर अश्किन, जेरार्ड मॉरो, डोना स्ट्रीक्लन्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर

आर्थर अश्किन, जेरार्ड मॉरो, डोना स्ट्रीक्लन्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर

Next

नवी दिल्ली: भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार यंदा तिघांना जाहीर झाला आहे. आर्थर अश्किन, जेरार्ड मॉरो आणि डोना स्ट्रिक्लन्ड यांना भौतिकशास्त्रातील अमूल्य कामगिरीबद्दल नोबेल पुरस्कार विभागून देण्यात येईल. या तिन्ही वैज्ञानिकांनी लेजर तंत्रज्ञान क्षेत्रात बहुमूल्य संशोधन केलं. त्यांच्या या कार्याचा गौरव नोबेल पुरस्कारानं करण्यात येणार आहे. 

रॉयल स्वीडिश अॅकडमी ऑफ सायन्सकडून नोबेल पुरस्काराचे मानकरी निश्चित केले जातात. एक नोबेल पुरस्कार जास्तीत जास्त तीन वैज्ञानिकांना विभागून दिला जाऊ शकतो, असा नियम आहे. त्यामुळे आर्थर अश्किन, जेरार्ड मॉरो आणि डोना स्ट्रिक्लन्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विभागून देण्यात येईल. गेल्या वर्षीदेखील भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन वैज्ञानिकांना विभागून देण्यात आला होता. हे तिन्ही वैज्ञानिक अमेरिकेचे होते.




मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार काल जाहीर झाला. संशोधक जेम्स पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना संयुक्तरित्या हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. करोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल असेंब्लीमध्ये सोमवारी 2018 च्या मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारासाठी जेम्स पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांची निवड करण्यात आली.  

Web Title: arthur ashkin gerard mourou donna strickland Win 2018 Nobel Prize In Physics For Laser Inventions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.