शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

जगभर : ‘ब्लड मनी’मुळे टळली भारतीयाची फाशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 08:33 IST

संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांत काही गंभीर गुन्ह्यांवर सजा माफही केली जाते. त्यातलाच एक नियम आहे ‘ब्लड मनी.’ विशेषत: एखाद्या गुन्ह्यात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्या व्यक्तीची फाशी रद्द होऊ शकते. 

प्रत्येक देशात गुन्हेगारीसंदर्भात वेगवेगळे कायदे आहेत. काही ठिकाणी कायदे अतिशय कडक, तर काही ठिकाणी त्यातल्या त्यात मवाळ कायदे आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून अनेक देशांत फाशीची शिक्षा आता रद्द करण्यात आली आहे. तथापि, काही देशांत ही पद्धती अजूनही चालू आहे. त्या-त्या देशाची संस्कृती, परंपरा यांचाही अंमल बऱ्याचदा तिथल्या कायद्यांवर पडलेला दिसतो. संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांत काही गंभीर गुन्ह्यांवर सजा माफही केली जाते. त्यातलाच एक नियम आहे ‘ब्लड मनी.’ विशेषत: एखाद्या गुन्ह्यात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्या व्यक्तीची फाशी रद्द होऊ शकते. 

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून नुकतेच एका भारतीय तरुणाला नवजीवन मिळाले आहे. केरळच्या या तरुणाचे नाव आहे बेक्स कृष्णन. खरे तर २०१२चा हा खटला. गेल्या अनेक वर्षांपासून बेक्स तुरुंगातच होता. निष्काळजीपणे वाहन चालवून एका सुदानी व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने यूएईच्या सर्वोच्च न्यायालयाने बेक्सला फाशीची शिक्षा सुनावली होती. बेक्सच्या कुटुंबाने तेव्हापासूनच ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्याची फाशी माफ करण्याचा प्रयत्न चालवला होता.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ब्लड मनी’ ही न्यायदानाची एक पद्धत मानली जाते. एखाद्याच्या मृत्यूची भरपाई कशानेही करता येत नाही. कारण ती व्यक्ती काही परत येणार नसते. त्यामुळे अपराध्याकडून भलीमोठी रक्कम घेतली जाते आणि ती पीडित परिवारातील व्यक्तींना दिली जाते. त्यालाच ‘ब्लड मनी’ म्हटले जाते; पण यात सर्वांत महत्त्वाचा नियम म्हणजे या तोडग्याला पीडित व्यक्तीच्या कुटुंबाची मान्यता असलीच पाहिजे. त्यांनी परवानगी दिली तरच हा पर्याय वापरला जाऊ शकतो.   

बेक्सचे कुटुंबीय तसे सर्वसामान्य; पण तरीही आपला मुलगा वाचावा, त्याला जीवनदान मिळावे यासाठी गेल्या दहा वर्षांपासून ते प्रयत्न करीत होते. पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या ते अक्षरश:  हातापाया पडत होते; पण बेक्सला माफी देण्यास हे कुटुंब तयार नव्हते. २०२१च्या सुरुवातीला तर ते पुन्हा सुदानला निघून गेले. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क अधिकच कठीण झाला. बेक्सला वाचविण्यात आपण अपयशी ठरू असे बेक्सच्या कुटुंबीयांनाही वाटायला लागले. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी  लुलू ग्रुपचे प्रसिद्ध उद्योजक अनिवासी भारतीय युसूफ अली यांची मदत मागितली. नेमके काय झाले होतेे हे समजून घेतल्यानंतर त्यांनी त्वरित सूत्रे हलवली, पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना सुदानमध्ये शोधूनही काढले आणि त्यांच्याशी बातचीत सुरू केली. खरे तर दोन्ही कुटुंबांशी त्यांचा काहीही संबंध नव्हता.

तरीही दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांशी त्यांनी अनेकदा संवाद साधला. पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना अनेक वेळा विनवण्या, विनंत्या केल्या; पण बेक्सला माफ करायला ते तयार नव्हते. तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर त्यांच्या उदंड मेहनतीला आणि प्रयत्नांना यश आले, ‘ब्लड मनी’साठी पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्यांनी राजी केले आणि गेल्या सुमारे दहा वर्षांपासून सुरू असलेला अतिशय किचकट असा तिढा सोडवला, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे युसूफ अली एवढ्यावरच थांबले नाहीत, ‘ब्लड मनी’साठी ज्या रकमेची तडजोड झाली, ते तब्बल पाच लाख दिऱ्हम म्हणजे सुमारे एक कोटी रुपये कोर्टातही जमा केले.

बेक्स आता तुरुंगातून सुटून केरळमधल्या आपल्या कुटुंबीयांना भेटू शकतो. आपली फाशी रद्द झाली हे ऐकल्यानंतर बेक्सलाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण इतक्या वर्षांनंतर तुरुंगातून सुटण्याची आणि आपली फाशी रद्द होण्याची शक्यता त्यानेही सोडून दिली होती. आपल्या मृत्यूची तो फक्त वाट पाहात होता. या घटनेनंतर तुरुंगात भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना बेक्स अतिशय भावुक झाला होता. त्याला रडूच कोसळले. आपण जिवंत राहू, आपल्या कुटुंबीयांना परत भेटू, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असे त्याने सांगितले. कोणाचे कोण, पण काहीही संबंध नसताना युसूफ अली यांनी त्याच्यासाठी जी अपार मेहनत घेतली, त्याबद्दल त्याला अतिशय गहिवरुन आले. कुटुंबीयांना भेटण्याआधी मी युसूफ अलींना भेटेन, त्यांच्या पायावर डोके ठेवेन आणि मगच घरी जाईन असे तो म्हणाला!

१७ भारतीय तरुणांना जीवनदान!‘ब्लड मनी’ दिला म्हणजे आरोपींची निर्दोष सुटका होते असे नाही, त्या व्यक्तीचा मृत्युदंड तेवढा वाचतो. न्यायालय त्या व्यक्तीला तुरुंगवासाची सजा देऊच शकते. काही वर्षांपूर्वी असाच एक प्रसंग यूएईमध्ये घडला होता. पाकिस्तानी नागरिक मिश्री खान याच्या मृत्यूप्रकरणी कोर्टाने पंजाब आणि हरयाणाच्या १७ भारतीय युवकांना दोषी मानून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, पण एस.एस. ओबेरॉय या दानशूराने मध्यस्ती केली. आठ कोटी रुपये ‘ब्लड मनी’ देऊन या तरुणांना पुनर्जन्म दिला होता. कोर्टाने हा तोडगा स्वीकारताना अपराध्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली, पण त्यांनी आधीच तीन वर्षं तुरुंगात काढली असल्याने त्यांची सुटका करण्यात आली होती.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय