शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जगभर : सोन्याच्या ५०० खाणी असलेला ‘गरीब’ देश; तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 12:58 IST

Largest gold mines vietnam: प्राचीन काळापासून हा देश आणि इथले लोक सोन्यासाठी प्रसिद्ध आहेत. या देशात जगातलं पहिलं हॉटेल आहे, जे चक्क सोन्याचं आहे.

समजा तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्ही मला एक हजार रुपये द्या, मी त्याचे थोड्याच वेळात तुम्हाला तीन लाख करून देतो, तर तुम्ही विश्वास ठेवाल? अर्थात, आपल्याकडं असे अनेक भामटे दिसतात, जे लोकांना अशीच काही आमिषं दाखवून त्यांना लुबाडत असतात. तुमचे पैसे दुप्पट करून देतो, महिन्याला दहा टक्के व्याज देतो, अत्यंत कमी पैशांत महागड्या वस्तू देतो... असं सांगून लुबाडणाऱ्या लोकांची आणि ‘स्कीम्स’ची एकामागून एक रांग लागलेली आपल्याला दिसते. ‘एक हजार रुपयांचे तीन लाख देतो’ ही त्यातलीच एखादी ‘स्कीम’ नाही, तर ही वास्तवातली गोष्ट आहे. ज्या देशांचं चलन अत्यंत कमजोर आहे, त्यात व्हिएतनाम हा देश मोडतो. भारतीय चलनातील हजार रुपये व्हिएतनामी चलनाच्या तीन लाख ‘डोंग’इतके आहेत इतकं व्हिएतनामचं चलन कमजोर आहे. असं असलं तरी या देशाला एक अत्यंत वैभवशाली वारसा आहे, तो म्हणजे या देशात सोन्याच्या मोठमोठ्या खाणी आहेत. 

प्राचीन काळापासून हा देश आणि इथले लोक सोन्यासाठी प्रसिद्ध आहेत. या देशात जगातलं पहिलं हॉटेल आहे, जे चक्क सोन्याचं आहे. व्हिएतनामची राजधानी हनोई येथे असलेल्या या सोन्याच्या हॉटेलचं नावही ‘गोल्डन लेक’ असंच आहे. या हॉटेलला सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. २५ मजली या हॉटेलमध्ये ४०० खोल्या आहेत. 

या हॉटेलमध्ये सगळं काही सोन्याचं आहे. सोन्याचे दरवाजे, सोन्याच्या खिडक्या, सोन्याचे नळ, इतकंच काय या हॉटेलमधली शौचालयंही सोन्याची आहेत! सिंगापूर बुलियन मार्केटच्या अहवालानुसार २०२१ मध्ये आशिया खंडातील सोन्याचा सर्वांत मोठा बाजार व्हिएतनाममध्ये होता. 

इथल्या सोन्याचा साठा दिवसेंदिवस वाढतोच आहे आणि आता तर चक्क तिथे सोन्याच्या चाळीस खाणी सापडल्या आहेत. त्यांत किमान तीस टन सोनं असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. आमच्या आर्थिक अडचणी आणि इतर आव्हानांचा सामना करण्यासाठी या सोन्याचा आम्हाला उपयोग होईल, असं व्हिएतनामी राज्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 

व्हिएतनाममध्ये जागोजागी सोन्याच्या खाणी आहेत. त्यातही बाक, कान, तुयेन क्वांग या प्रांतात आठ, लाई चाऊ प्रांतात पाच, थान होआ आणि नघे अन या प्रांतात चार, लांग सॉन आणि काओ बँग येथे तीन हा जिआंग आणि येन बाई येथे दोन, तर दिएन बिएन इथं एक.. अशा सोन्याच्या अनेक मोठ्या खाणी इथं आहेत. 

याशिवाय इतरही अनेक ठिकाणी सोन्याच्या लहान-मोठ्या खाणी आहेत. 

एका अंदाजानुसार व्हिएतनाममध्ये सोन्याच्या ज्या खाणी आहेत, त्यात सोन्याचे तब्बल ५०० साठे आहेत. या सर्व खाणींमध्ये मिळून सुमारे तीनशे टन सोनं असल्याचा तज्ज्ञांचा कयास आहे. नुसतं सोनंच नाही, तर थेट सोन्याच्या खाणीच इथं सापडत असल्यानं व्हिएतनाम आणि संपूर्ण जगाचं या देशाकडं लक्ष लागून असतं. 

व्हिएतनाममधील सोन्याच्या खाणी मुख्यत: त्यांच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात आहेत. उरलेल्या खाणी मध्य प्रांतात आहेत. व्हिएतनामी लोकांचं म्हणणं आहे, आमच्या देशाचं चलन अत्यंत कमजोर असल्यानं त्याचा मोठा फटका आम्हाला बसतो; पण आमचा देश ‘सोन्याचा’ आहे, याचा आम्हाला खूप अभिमान आहे!..

टॅग्स :GoldसोनंGold Spot Exchangeगोल्ड स्पॉट एक्स्चेंजWorld Trendingजगातील घडामोडीInvestmentगुंतवणूक