शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स यांना मागे टाकत अरनॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 04:43 IST

श्रीमंत म्हणून बहुमान मिळविलेले तसेच या यादीत नंबर २ पेक्षा कधीही खाली न आलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (अमेरिका) यांना यंदा दिग्गजांनी मागे टाकले आहे.

ब्लूमबर्ग : गत सात वर्षांपासून जगातील सर्वात श्रीमंत म्हणून बहुमान मिळविलेले तसेच या यादीत नंबर २ पेक्षा कधीही खाली न आलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (अमेरिका) यांना यंदा दिग्गजांनी मागे टाकले आहे. त्यामुळे बिल गेट्स श्रीमंतांच्या यादीत तिसºया क्रमांकावर गेले आहेत.ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट हे दुसºया क्रमांकावर पोहोचले आहेत. तर, श्रीमंतांच्या यादीत क्रमांक एकवर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस (अमेरिका) यांचे वर्चस्व कायम आहे.बर्नार्ड अरनॉल्ट हे फ्रान्समधील लग्झरी गुड्स कंपनी एलव्हीएमएचचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. ७० वर्षीय अरनॉल्ट यांची कंपनी फ्रान्समधील चर्चित कंपनी आहे. १९८४ मध्ये त्यांनी लग्झरी गुड्स मार्केटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी टेक्सटाइल ग्रुपचेही अधिग्रहण केले.संगणक क्षेत्रात मोठा दबदबा असलेले बिल गेट्स यांनी आपली ३५ बिलियन डॉलरची संपत्ती बिल अ‍ॅण्ड मिलिंदा गेट्स फाउंडेशनला दान केलेली आहे. अन्यथा आजही ते जगातील क्रमांक एकचे श्रीमंत व्यक्ती असले असते.तथापि, बेजोस यांनी घटस्फोटानंतर पत्नीला दिलेल्या मोठ्या रकमेनंतरही ते जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या यापूर्वीच्या पत्नी मॅकेन्जी बेजोस या सध्या जगातील चौथ्या सर्वात श्रीमंत महिला आहेत.>आकडे काय सांगतात?ताज्या आकडेवारीनुसार, बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती १०८ बिलियन डॉलरवर (७.४५ लाख कोटी) पोहोचली आहे. बिल गेट्स यांचीसंपत्ती १०७.६ बिलियन डॉलर (७.३८ लाख कोटी) आहे. प्रथम क्रमांकावर असलेल्या जेफ बेजोस यांची संपत्ती १२५ बिलियन डॉलर (८.६२ लाख कोटी) आहे.ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, या यादीत ज्या ५०० श्रीमंतांचा समावेश आहे त्यात एकटे अरनॉल्ट असे आहेत ज्यांनी कमी कालावधीत हा टप्पा गाठला आहे.