मागील काही दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने सुरू आहेत. शेकडो लोक रस्त्यावर उतरून गोंधळ करत आहेत. पाकिस्तान सरकारने लष्कराला पाचारण केले आहे. पण आता पाकिस्तानी लष्कराला अपमान सहन करावा लागत आहे. पीओकेमध्येही सैन्याची खिल्ली उडवली जात आहे. पाकव्याप्त काश्मीर मधील परिस्थिती सध्या भयानक आहे. शुक्रवारी नागरिकांच्या निदर्शनांचा चौथा दिवस होता. निदर्शक त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला आहे, पण तरीही निदर्शने सुरूच आहेत. या गोंधळातही, निदर्शक पाकिस्तानी लष्कराची खिल्ली उडवत आहेत.
पीओकेमधील गोंधळा दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचा गणवेश, हेल्मेट आणि इतर उपकरणे फक्त १० रुपयांना विकली जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका निदर्शना जवळचा असल्याचे सांगितले जात आहे. निदर्शकांना पाकिस्तानी लष्कराचा गणवेश, हेल्मेट १० रुपयांना विकण्याचा दावा करून त्यांची खिल्ली उडवत असल्याचे दिसत आहे.
पीओकेमध्ये पाक सैन्याची खिल्ली उडवली
व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंपणाला लटकलेले पाक सैन्याचे गणवेश, हेल्मेट आणि इतर वस्तू दिसत आहेत. काही लोक सैन्याची खिल्ली उडवताना आणि या वस्तू प्रत्येकी १० रुपयांना विकल्या जात असल्याचा दावा करताना ऐकू येत आहे.
निदर्शक ३८ मागण्यांवर ठाम
पाकिस्तानच्या पीओकेमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांनी पाकिस्तानातील शाहबाज सरकारला हादरवून सोडले आहे. निदर्शक ३८ मागण्यांवर ठाम आहेत, यामध्ये पीओके विधानसभेत पाकिस्तानात राहणाऱ्या काश्मिरी निर्वासितांसाठी राखीव असलेल्या १२ जागा रद्द करणे समावेश आहे. आयएसआय समर्थित मुस्लिम कॉन्फरन्सला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणीही निदर्शक करत आहेत. मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे अशी त्यांची मागणी आहे.
पीओकेमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू
पीओकेमध्ये हिंसक चकमकी सुरूच आहेत. संयुक्त अवामी कृती समितीने पुकारलेल्या संपादरम्यान तीन पोलिसांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी पीओकेमध्ये झालेल्या निदेर्शनामुळे व्यापार आणि इतर क्रियाकलाप विस्कळीत झाले, यामुळे या प्रदेशातील दळणवळण विस्कळीत झाले. धीर कोट आणि पीओकेच्या इतर भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. या चकमकीत १७२ पोलिस आणि ५० नागरिक जखमी झाले.
Web Summary : Protests surge in PoK against Pakistan. Demonstrators mock the army, selling uniforms for just ₹10. Clashes intensify, leaving nine dead and many injured as protestors demand rights and denounce Pakistani rule.
Web Summary : पीओके में पाकिस्तान के खिलाफ प्रदर्शन तेज। प्रदर्शनकारियों ने सेना का मजाक उड़ाया, वर्दी सिर्फ ₹10 में बेची। झड़पें तेज, नौ की मौत, कई घायल; प्रदर्शनकारी अधिकारों की मांग और पाकिस्तानी शासन की निंदा करते हैं।