अॅर्गनचे तेल आणि झाडावर चढणाऱ्या शेळ्या, मेंढ्या
By Admin | Updated: March 22, 2017 00:52 IST2017-03-22T00:52:18+5:302017-03-22T00:52:18+5:30
आपण वानरांना झाडावर चढताना-उतरताना पाहिले आहे. मात्र, आफ्रिकी देश मोरक्कोत वानरांप्रमाणे शेळ्याही झाडांवर चढून फळे खाताना दिसून येतील.

अॅर्गनचे तेल आणि झाडावर चढणाऱ्या शेळ्या, मेंढ्या
रबात : आपण वानरांना झाडावर चढताना-उतरताना पाहिले आहे. मात्र, आफ्रिकी देश मोरक्कोत वानरांप्रमाणे शेळ्याही झाडांवर चढून फळे खाताना दिसून येतील. मोरक्कोच्या या शेळ्या झाडावर चढण्यात कुशल असतात. या शेळ्यांची दुसरी खास बाब म्हणजे, त्यांच्या लेंड्या एवढ्या किमती असतात की, त्याद्वारे येथील शेतकरी लाखो आणि कोट्यवधी रुपये कमावतात. आता तुम्हाला वाटेल, या लेंड्यांत एवढे खास काय आहे. नैऋत्य मोरक्को आणि अल्जेरियाच्या काही भागांत अॅर्गन नावाचे एक झाड सापडते. त्याची फळे या शेळ्यांना खूपच आवडतात. ही फळे खाल्ल्यानंतर शेळ्या त्यांचा गर तर पचवतात. मात्र, बी (गुठळी) लेंड्याद्वारे बाहेर टाकतात. शेतकरी या लेंड्यांतील गुठळ्यांना कुटून अॅर्गनचे तेल काढतात. सौंदर्यप्रसाधने उद्योगात या तेलाला प्रचंड मागणी आहे. एक लीटर तेलाला जवळपास ७० हजार रुपये मिळतात. काही भागांत शेतकरी महिलाही अॅर्गनची फळे तोडण्याचे काम करतात. मात्र, त्यामुळे झाडाचे नुकसान होण्याचा धोका असतो. झाडाचे नुकसान होऊ नये, म्हणून शेतकरी या शेळ्यांनाच झाडावर चढू देतात. या शेळ्या आणि अॅर्गनच्या झाडांनी येथील अनेक शेतकऱ्यांना मालामाल केले आहे.