समलिंगी असल्याचा अभिमान आहे - अॅपलचे सीईओ टीम कुक
By Admin | Updated: October 30, 2014 19:15 IST2014-10-30T19:15:51+5:302014-10-30T19:15:51+5:30
मी समलिंगी असून गे असल्याचा मला अभिमान आहे अशी जाहीर कबुली अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी दिली आहे.

समलिंगी असल्याचा अभिमान आहे - अॅपलचे सीईओ टीम कुक
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि.३० - मी समलिंगी असून गे असल्याचा मला अभिमान आहे अशी जाहीर कबुली अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी दिली आहे. मी गे असल्याचे माझ्या कर्मचा-यांनाही माहित असून याचा परिणाम माझ्या कामावर होत नाही असे कुक यंनी म्हटले आहे.
अमेरिकेतील बिझनेस वीक टुडे या मासिकात अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी लेख लिहीला असून या लेखात त्यांनी समलिंगी असल्याची जाहीर कबुली दिली. मी समलिंगी असणे ही देवाने मला दिलेली सर्वात मोठी भेट असल्याचे कुक म्हणतात. मी समलिंगी असल्याचे जगजाहीर करणे हा माझ्यासाठी सर्वात कठीण निर्णय होता. खासगी आयुष्य माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. पण ही गोष्ट सर्वांसमोर स्वीकारुन समानतेला वाव देण्यासाठी मी हे जाहीर करतोय असे कुक यांनी म्हटले आहे. अॅपलसारख्या ख्यातनाम कंपनीच्या सीईओने अशी जाहीर कबुली दिल्याने समलिंगींच्या हक्कांसाठी लढा देणा-या संघटनांना नवीन बळ मिळेल ऐवढे मात्र नक्की.