ब्रिटनमध्ये दहशतवाद प्रतिबंधक कारवाई
By Admin | Updated: October 15, 2014 03:50 IST2014-10-15T03:50:25+5:302014-10-15T03:50:25+5:30
ब्रिटिश पोलिसांनी सिरियातील यादवीशी संबंधित दहशतवाद प्रतिबंधक मोहिमेत मंगळवारी तीन पुरुष आणि तेवढ्याच महिलांना अटक केली.

ब्रिटनमध्ये दहशतवाद प्रतिबंधक कारवाई
लंडन : ब्रिटिश पोलिसांनी सिरियातील यादवीशी संबंधित दहशतवाद प्रतिबंधक मोहिमेत मंगळवारी तीन पुरुष आणि तेवढ्याच महिलांना अटक केली. दहशतवाद प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी लंडन, पोर्टस्माउथ, दक्षिण किनारपट्टी, फार्नबोरो व लंडनच्या पश्चिमेकडे कारवाई करून या संशयिताना अटक केली. संशयित हे २३ ते ५७ वर्षे वयोगटातील आहेत. आॅगस्टमध्ये ब्रिटनने आंतरराष्ट्रीय धोक्याची पातळी दुसऱ्या श्रेणीपर्यंत वाढविली. याचा अर्थ असा की, ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.