पाकव्याप्त काश्मिरमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणा

By Admin | Updated: August 13, 2016 10:46 IST2016-08-13T10:43:36+5:302016-08-13T10:46:40+5:30

व्याप्त काश्मीरमधील गिलगिलत बालिस्तानमध्ये स्थानिक नागरिक पाकिस्तानी सुरक्षा जवानांच्या विरोधात उतरले असून पाकव्याप्त काश्मीरमध्येच पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या जात आहेत.

Anti-Pakistan Declaration in PoK | पाकव्याप्त काश्मिरमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणा

पाकव्याप्त काश्मिरमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणा

ऑनलाइन लोकमत
गिलगित बल्तिस्तान, दि. १३ - पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगित बाल्तिस्तानमध्ये स्थानिक नागरिक पाकिस्तानी सुरक्षा जवानांच्या विरोधात उतरले असून पाकव्याप्त काश्मीरमध्येच पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या जात आहेत. हजारो नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपली नाराजी नोंदवली. तसेच बाब जन या कार्यकर्त्याची सुटका व्हावी अशी मागणीही केली. दरम्यान नागरिकांच्या या आंदोलनानंतर सुमारे ५०० तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत शुक्रवारीच ठासून सांगितले होते. पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानात नागरिकांवर पाकिस्ताकडून होत असलेले अत्याचार भारतीयांनी जगासमोर आणावेत, असेही ते म्हणाले होते. 

Web Title: Anti-Pakistan Declaration in PoK