इसिसविरोधी संघर्ष; अमेरिका आक्रमक
By Admin | Updated: November 11, 2014 02:27 IST2014-11-11T02:27:05+5:302014-11-11T02:27:05+5:30
अमेरिकन आघाडीचे मनोधैर्य वाढले असून आतार्पयत बचाव धोरणाने लढणारी अमेरिका आता आक्रमक धोरणाने लढणार, असे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केले आहे.

इसिसविरोधी संघर्ष; अमेरिका आक्रमक
वॉशिंग्टन/बगदाद : अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराक व सिरियात लढणा:या आघाडीच्या विमानांनी केलेल्या हल्ल्यात इसिसचा नेता अबू बक्र अल बगदादी हा जखमी झाल्याचे, तसेच अनेक नेते मारले गेल्याचे वृत्त आल्यामुळे अमेरिकन आघाडीचे मनोधैर्य वाढले असून आतार्पयत बचाव धोरणाने लढणारी अमेरिका आता आक्रमक धोरणाने लढणार, असे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केले आहे.
सीबीएस वाहिनीला फेस द नेशन या कार्यक्रमाअंतर्गत दिलेल्या मुलाखतीत ओबामा बोलत होते.
बगदादी जखमी झाल्याचा दावा
अमेरिकन आघाडीने केलेल्या हवाई हल्ल्यात इसिसच्या बैठकीतील अनेक नेते मृत झाले असून, इसिसचा प्रमुख अल बगदादी हा जखमी झाला आहे, असे इराकच्या संरक्षण व गृहमंत्रलयाने सांगितले. (वृत्तसंस्था)