डोपिंगमध्ये अडकला पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू
By Admin | Updated: December 27, 2015 16:58 IST2015-12-27T16:19:07+5:302015-12-27T16:58:21+5:30
पाकिस्तानचा फॉर्ममध्ये असलेला लेगस्पिनर यासिर शहाचा डोपिंग चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आयसीसीने त्याला निलंबित केले आहे.

डोपिंगमध्ये अडकला पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - पाकिस्तानचा फॉर्ममध्ये असलेला लेगस्पिनर यासिर शहाचा डोपिंग चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आयसीसीने त्याला निलंबित केले आहे. आयसीसीने टि्वटरवरुन यासिर शहाच्या निलंबनाची माहिती दिली.
यासिरने १३ नोव्हेंबरला २०१५ रोजी डोपिंग चाचणीसाठी नमुने दिले होते. वाडाने प्रतिबंधित केलेल्या पदार्थाचे घटक यासिरच्या नमुन्यांमध्ये सापडल्यामुळे यासिरला अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले. आयसीसीचे डोपिंग विरोधी जे नियम आहेत त्यानुसार यासिरवर आता पुढील कारवाई होईल.