झिम्बाब्वेत आणखी एका सिंहाची शिकार

By Admin | Updated: August 3, 2015 23:09 IST2015-08-03T23:09:36+5:302015-08-03T23:09:36+5:30

झिम्बाब्वेतील सेसिल द लायन या प्रसिद्ध सिंहाची शिकार अमेरिकेतील दंतवैद्याने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, आता झिम्बाब्वेतील दुसऱ्या सिंहाचीही शिकार

Another lion victim in Zimbabwe | झिम्बाब्वेत आणखी एका सिंहाची शिकार

झिम्बाब्वेत आणखी एका सिंहाची शिकार

वॉशिंग्टन : झिम्बाब्वेतील सेसिल द लायन या प्रसिद्ध सिंहाची शिकार अमेरिकेतील दंतवैद्याने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, आता झिम्बाब्वेतील दुसऱ्या सिंहाचीही शिकार झाली असून त्याची शिकारही अमेरिकेतीलच दुसऱ्या डॉक्टरने केली असा आरोप झिम्बाब्वेतील वन अधिकाऱ्यांनी केला आहे.
डॉ. जान सेस्की असे दुसऱ्या अमेरिकी डॉक्टरचे नाव असून, तो पिटस्बर्ग येथे महिलांसाठी आरोग्यधाम चालवतो. झिम्बाब्वे येथील वनअधिकाऱ्यांनी तो न्याला सफारीचा ग्राहक असल्याचे सांगितले. या सफारीचा मालक जमीनदार असून त्याला बेकायदेशीर शिकारीसाठी आधीही अटक झाली आहे. झिम्बाब्वेचे वनमंत्री प्रिन्स मुपाझेविरीहो यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार दोषी डॉक्टर सेस्की एप्रिल महिन्यात झिम्बाब्वेतच होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Another lion victim in Zimbabwe