इसिसकडून आणखी 30 जणांची हत्या
By Admin | Updated: April 20, 2015 10:44 IST2015-04-20T10:39:41+5:302015-04-20T10:44:32+5:30
इसिस या दहशतवादी संघटनेने रविवारी 30 ख्रिश्चन नागरिकांची हत्या केली असून त्या क्रूर कृत्याचा व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे.

इसिसकडून आणखी 30 जणांची हत्या
>ऑनलाइन लोकमत
कैरो, दि. 20 -इसिस या दहशतवादी संघटनेने रविवारी 30 ख्रिश्चन नागरिकांची हत्या केली असून त्या क्रूर कृत्याचा व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे. इससिने आता आपला मोर्चा लिबीयाकडे वळवला असून तेथील एका शहरातील 30 नागरिकांना ठार मारण्यात आले आहे. इसिसच्या दहशतवाद्यांनी सुमारे 15 नागरिकांना गोळ्या गालून ठार मारले तर इतरांना समुद्रकिनारी नेऊन त्यांच्या शिरच्छेद करण्यात आल्याचे 29 मिनिटांच्या या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. मात्र या वृत्ताबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसून त्या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहण्याचे काम सुरू आहे.