पृथ्वीच्या आकाराचे आणखी १०० ग्रह
By Admin | Updated: May 12, 2016 22:54 IST2016-05-11T05:16:40+5:302016-05-12T22:54:32+5:30
नासाच्या केप्लर दुर्बिणीने पृथ्वीच्या आकाराएवढ्या शंभर ग्रहांचा शोध लावला आहे. या शोधामध्ये नासाने आपल्या सूर्यमालिके बाहेरील १२८४ ग्रहांचा शोध लावला

पृथ्वीच्या आकाराचे आणखी १०० ग्रह
ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. ११ : आकाशगंगेमध्ये पृथ्वीच्या आकाराचे १०० पेक्षा अधिक ग्रह असलेल्याचा शोध अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने लावला आहे. नासाच्या केप्लर दुर्बिणीने पृथ्वीच्या आकाराएवढ्या शंभर ग्रहांचा शोध लावला आहे. या शोधामध्ये नासाने आपल्या सूर्यमालिके बाहेरील १२८४ ग्रहांचा शोध लावला असून यामधील काही ग्रह अधिवासक्षम क्षेत्रात आहेत. यात ५५० लहान ग्रह असून त्यापैकी काही ग्रह खडकाळ आहेत. आकाशगंगेतील अधिवासक्षम ग्रहांचा शोध घेत असून असे अब्जावधी ग्रह असण्याची शक्यता आहे, अशी माहिती केपलर प्रकल्पाच्या डॉ. नताली बताल्हा यांनी दिली.
केप्लरच्या या नव्या शोधामुळे आकाशगंगेमध्ये अनेक छोटे ग्रह असल्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे शास्त्रज्ञ नताली बताल्हा यांनी सांगितले. मोठ्या ग्रहांच्या तुलनेत छोट्या ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता जास्त असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.