शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानच्या नवीन राष्ट्रपतींची घोषणा, अशरफ गनींचा फोटो काढून फेकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 15:48 IST

सालेह यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावास कार्यालयातून अशरफ गनी यांना फोटो काढून टाकण्यात आला आहे.

ठळक मुद्देताजिकिस्तानच्या दुतावासाने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचं खुलं समर्थन केलं आहे. ताजिकिस्तान अफगाणिस्तानकडून त्रस्त होता, आणि सालेह हेही मूळचे ताजिक आहेत

काबुल - भारतात १५ ऑगस्टला संपूर्ण देश ७५ वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करत होता. त्याचदिवशी अफगाणिस्तानात मोठा हिंसाचार सुरु होता. तालिबाननंअफगाणिस्तानवर(Afghanistan) कब्जा केला. राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींनी संसद, राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केले. त्यानंतर, उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला राष्ट्रपती घोषित केलं आहे. 

सालेह यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावास कार्यालयातून अशरफ गनी यांना फोटो काढून टाकण्यात आला आहे. त्याऐवजी आता अमरुल्ला सालेह यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच, पंचशीरचा वाघ म्हटलं जाणाऱ्या अहमद शाह मसूद यांचाही फोटो दुतावासात लावण्यात आला आहे. सालेह यांच्या या घोषणेमुळे आता तालिबान चांगलाच संतापला असणार आहे. त्यामुळे, तालिबानच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष लागले आहे. 

ताजिकिस्तानच्या दुतावासाने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचं खुलं समर्थन केलं आहे. ताजिकिस्तान अफगाणिस्तानकडून त्रस्त होता, आणि सालेह हेही मूळचे ताजिक आहेत. या घोषणेमुळे तालिबानचा पारा चढण्याची शक्यता आहे. अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केल्यानंतर अमरुल्ला सालेह यांनी आपण राष्ट्रपती बनल्याची घोषणा केली. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावरही निशाणा साधला. बायडन यांच्यासोबत चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, असे त्यांनी म्हटलंय.  सालेह यांनी अफगाणी नागरिकांना तालिबानविरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत, पलायन, राजीनामा किंवा मृत्यूनंतर उपराष्ट्रपतींकडे राष्ट्रपतीपदाची जबाबदारी येते, असे अफगाणिस्तानच्या संविधानात लिहिल्याचे सालेह यांनी म्हटले आहे. मी सर्वच नेत्यांशी त्यांच्या समर्थनासाठी संपर्क करणार असल्याचंही सालेह यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. 

बायडन यांचा अशरफ गनींवर निशाणा

अफगाणिस्तानातील अस्थिरता कमी संपेल याची कुणालाही शाश्वती नाही. अफगाणिस्तान सैनिक लढत नाही मग कधीपर्यंत अमेरिकेचे सैन्य पाठवत राहू असं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी करत तेथील जनतेला प्रश्न विचारला आहे. अफगाणिस्तानावर तालिबानचा ताबा आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी देश सोडून पळालेले अशरफ गनी यांना दोषी ठरवले आहे. देशाच्या जनतेच्या मदतीसाठी ठामपणे उभं राहण्याऐवजी ते न लढताच पळून गेले अशी टीका बायडन यांनी केली आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका