मध्यावधीची जपानमध्ये घोषणा

By Admin | Updated: November 19, 2014 00:06 IST2014-11-19T00:06:43+5:302014-11-19T00:06:43+5:30

जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली असून, संसदेचा कालावधी संपण्याच्या दोनवर्षे आधी ही निवडणूक होत आहे.

The announcement in mid-term Japan | मध्यावधीची जपानमध्ये घोषणा

मध्यावधीची जपानमध्ये घोषणा

टोकिओ : जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली असून, संसदेचा कालावधी संपण्याच्या दोनवर्षे आधी ही निवडणूक होत आहे. जपानी अर्थव्यवस्था मंदीच्या विळख्यात गेल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत अ‍ॅबे यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ नोव्हेंबर रोजी संसद विसर्जित केली जाईल ही निवडणूक डिसेंबरमध्ये होईल. अ‍ॅबे यांनी गेली निवडणूक अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या आश्वासनावर जिंकली होती. पण या सुधारणा करताना अडचणी येत आहेत. अ‍ॅबे यांची लोकप्रियता घसरली आहे, पण तरीही ते निवडणूक जिंकतील असे विश्लेषकांचे मत आहे.
आर्थिक मंदी
२०१२ साली जपानच्या सरकारने देशावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी सेल्सटॅक्स वाढविण्याची योजना मांडली होती. त्यानुसार यावर्षी एप्रिलमध्ये ५ ते ८ टक्के सेल्सटॅक्स वाढविण्यात आला.
पुढची १० टक्के वाढ आॅक्टोबर २०१५ मध्ये प्रस्तावित होती. यामुळे उत्पन्न वाढेल तसेच नागरिकांचा खर्चही वाढेल असे अपेक्षित होते. पण जपानी ग्राहकांनी खर्च आवरता घेतला. याचा परिणाम अर्थव्यवस्था मंदीत जाण्यात झाला. (वृत्तसंस्था)



 

Web Title: The announcement in mid-term Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.