शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'पुढच्या महिन्यात पाकिस्तानातून भारतात परतणार अंजू', पती नसरुल्लाहचा दावा, सांगितलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 02:34 IST

राजस्थानातील अल्वर येथील रहिवासी असलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिची नवी ओळख फातिमा अशी आहे. तिने 25 जुलैला आपला 29 वर्षीय बॉयफ्रेंड नसरुल्लाहसोबत लग्न केले.

भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू पुढील महिन्यात पुन्हा भारतात परतणार असल्याचा दावा, तिचा नवा पती नसरुल्लाहने केला आहे. अंजू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून, तिला तिच्या दोन्ही मुलांची प्रचंड आठवण येत आहे. यामुळे ती पुढच्या महिन्यात भारतात परत आहे, असे नसरुल्लाहने म्हटले आहे.

राजस्थानातील अल्वर येथील रहिवासी असलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिची नवी ओळख फातिमा अशी आहे. तिने 25 जुलैला आपला 29 वर्षीय बॉयफ्रेंड नसरुल्लाहसोबत लग्न केले. नसरुल्लाहचे घर खैबर पख्तूनख्वाच्या अप्पर दिर जिल्ह्यात आहे. हे दोघेही 2019 मध्ये फेसबुक फ्रेंड बनले होते.

पीटीआय या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नसरुल्लाह म्हणाला, ''फातिमा (अंजू) पुढील महिण्यात भारतात परतत आहे. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून, तिला तिच्या मुलांची प्रचंड आठवण येत आहे. यामुळे परतण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाही."

अंजूचे पहिले लग्न राजस्थानातील रहिवासी अरविंदसोबत झाले होते. त्यांना 15 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगाही आहे. नसरुल्लाह म्हणाला, अंजूचे मानसिक आरोग्य चांगले रहावे, अशी माझी इच्छा आहे. यामुळे तिने तिच्या मुलांना भेटण्यासाठी तिच्या देशात जाणेच योग्य ठरेल. पाकिस्तानातील कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती परतेल.

तसेच, या प्रक्रियेला काही वेळ लागेल. ती साधारणपणे पुढील महिन्यात भारतात पोहोचेल. तर व्हिसा मिळाला तर आपणही भारतात येऊ. अंजू आणि नसरुल्लाह गेल्या महिन्यात लग्नानंतर पहिल्यांदाच पेशावरला गेले होते. त्यांनी तेथे दिवंगत दिलीप कुमार आणि शाहरुख खानची घरं पाहिली. अंजू म्हणाली, मी काही पश्तो शब्दही शिकले आहेत. एवढेच नाही, तर येथे येण्यापूर्वी मलावाटले नव्हते की, मला येथे एवढी प्रसिद्धी मिळेल, असेही अंजू म्हणाली.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPakistanपाकिस्तानIndiaभारतRajasthanराजस्थान