..तर भारत-व्हिएतनाम तेल शोध करार अमान्य

By Admin | Updated: September 17, 2014 01:23 IST2014-09-17T01:23:45+5:302014-09-17T01:23:45+5:30

भारत आणि व्हिएतनाम यांच्यात दोन तेल विहिरी खोदण्यासाठी झालेल्या कराराला चीनने आक्षेप घेतला आहे.

..and the Indo-Vietnam Oil Research Corrections invalid | ..तर भारत-व्हिएतनाम तेल शोध करार अमान्य

..तर भारत-व्हिएतनाम तेल शोध करार अमान्य

बीजिंग : भारत आणि व्हिएतनाम यांच्यात दोन तेल विहिरी खोदण्यासाठी झालेल्या कराराला चीनने आक्षेप घेतला आहे. हे तेल क्षेत्र वादग्रस्त दक्षिण चीनच्या समुद्रात असेल तर आम्ही हा करार मान्य करणार नाही, असे चीनने म्हटले 
आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या व्हिएतनामच्या विद्यमान दौ:यात हा करार झाला आहे. या कराराबद्दल प्रतिक्रिया विचारली असता चीनच्या परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते  हाँग लेई म्हणाले की, व्हिएतनाम आणि अन्य कोणत्याही तिस:या देशात कायदेशीर होणा:या कराराला चीनचा आक्षेप नाही. 
राष्ट्रपतींच्या (मुखर्जी) व्हिएतनाम दौ:याची आम्हाला माहिती आहे. नन्शा बेटे आणि त्या शेजारच्या समुद्रावर चीनचे निर्विवाद सार्वभौमत्व आहे, असे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. नंतर हाँग यांनी भारतीय प्रसारमाध्यमांना स्वतंत्र खुलासा केला की, व्हिएतनाम व अन्य कोणत्याही देशात होणा:या तेल शोध कराराबद्दल आमची भूमिका अशीच आहे, ती काही भारतासाठी वेगळी नाही. चीन ज्या बेटांना नन्शा म्हणते त्यांना व्हिएतनाम पारासेल बेटे म्हणते. 
या बेटांवरून चीन व व्हिएतनाम यांच्यात वाद आहे. यापूर्वी व्हिएतनामने तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाला तेल विहिरी शोधण्याचे काम दिले होते तेव्हाही चीनने असाच आक्षेप घेतला होता. दक्षिण चीन समुद्र हा सगळाच आमचा असल्याचा चीनचा दावा असून त्याला व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया व ब्रुनेईने विरोध केलेला आहे.  (वृत्तसंस्था)
 
च्गेल्या मे महिन्यात तेलाच्या विहिरी शोधण्यासाठी चीनने मोठे प्रयत्न करताच व्हिएतनाम व चीन यांच्यात हिंसक संघर्ष झाला होता.
च्व्हिएतनाममध्ये चीनविरोधात दंगल होऊन चार चिनी नागरिक त्यात ठार, तर 1क्क् पेक्षा जास्त चिनी नागरिक जखमी झाले होते. शिवाय चिनी मालकांचे 4क्क् पेक्षा जास्त कारखाने जाळण्यात आले होते. त्यानंतर चीन सरकारने 7क्क्क् कामगारांना त्यांचे जीवित सुरक्षित राहावे म्हणून मायदेशी बोलावले होते.
 

 

Web Title: ..and the Indo-Vietnam Oil Research Corrections invalid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.