रशियामधूनभारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. रशियामध्ये गेल्या काही दिवसांपासून कामगारांची कमतरता आहे. रशियाने २०२५ च्या अखेरीस भारतातून १० लाख कामगारांना बोलावण्याची योजना आखली आहे. युक्रेन युद्धामुळे रशियामध्ये कामगारांची कमतरता दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
उरल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे प्रमुख आंद्रेई बेसेदिन यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या संदर्भात भारतासोबत करार अंतिम झाला आहे. २०२५ पर्यंत १० लाख भारतीय कामगार रशियात, विशेषतः स्वेर्दलोव्हस्क प्रदेशात पोहोचतील. इतकेच नाही तर भारतीय कामगारांना मदत करण्यासाठी स्वेर्दलोव्हस्कची राजधानी येकातेरिनबर्गमध्ये एक नवीन भारतीय दूतावास देखील उघडणार आहे.
रशियाचा स्वेर्दलोव्हस्क प्रदेश हे उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे. धातू आणि यंत्रसामग्रीशी संबंधित कारखान्यांमध्ये कामगारांची मोठी कमतरता आहे. बेसेदिन यांच्या मते, युक्रेन युद्धामुळे रशियन कारखान्यात काम करत नाहीत. अशा परिस्थितीत, भारतातील मेहनती आणि कुशल कामगार ही पोकळी भरून काढू शकतात. येकातेरिनबर्ग शहर ट्रान्स-सायबेरियन रेल्वेद्वारे युरोप आणि आशियाला जोडणारे एक प्रमुख लॉजिस्टिक्स हब बनत आहे. यासोबतच, हे शहर आर्क्टिक विकासातही मोठी भूमिका बजावेल. भारतीय कामगारांना येथे धातू आणि यंत्रसामग्री उद्योगात मोठी संधी मिळेल.
थंड आव्हान असेल...
येकातेरिनबर्गचे हवामान भारतीयांसाठी एक कठीण काम असू शकते. उन्हाळ्यात तेथील तापमान २४ अंशांपर्यंत राहते, पण हिवाळ्यात ते -१७ अंशांपर्यंत खाली जाते. ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंत बर्फ पडलेला असतो. बहुतेक भारतीय कामगारांना मध्य पूर्वेतील उष्ण हवामानात काम करण्याची सवय असते, त्यामुळे रशियाची थंडी त्यांच्यासाठी एक नवीन आव्हान असेल. याशिवाय, जे शुद्ध शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करणे देखील कठीण होऊ शकते. रशियामध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे उबदार कपडे सहज उपलब्ध आहेत.
भारताव्यतिरिक्त, श्रीलंका, उत्तर कोरियातील लोकांनाही संधी
रशिया फक्त भारतावर अवलंबून नाही. बेसेदिन म्हणाले की, श्रीलंका आणि उत्तर कोरियामधूनही कामगार आणण्याची योजना आहे. उत्तर कोरियातील कामगार खूप मेहनती आहेत. पण भारतीय आणि श्रीलंकेतील कामगारांना रशियामध्ये जुळवून घेणे सोपे होणार नाही. रशियाला आधीच ताजिकिस्तान, उझबेकिस्तान सारख्या माजी सोव्हिएत देशांमधील कामगारांसोबत काम करण्याची सवय आहे, त्यांना रशियन भाषा आणि संस्कृती समजते.