अमूल थापर यांची नियुक्ती
By Admin | Updated: March 22, 2017 00:27 IST2017-03-22T00:27:38+5:302017-03-22T00:27:38+5:30
भारतीय वंशाचे अमेरिकी कायदेतज्ज्ञ अमूल थापर (४७) यांची अमेरिकेतील अपिली न्यायालयात प्रमुख पदावर नियुक्ती

अमूल थापर यांची नियुक्ती
वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अमेरिकी कायदेतज्ज्ञ अमूल थापर (४७) यांची अमेरिकेतील अपिली न्यायालयात प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नियुक्ती केली आहे. सिनेटच्या मंजुरीनंतर थापर हे अपिलीय न्यायालयाचा एक महत्त्वाचा भाग बनतील. केंटकी, टेनिसी, ओहियो आणि मिशीगन येथील अपिलांवर येथे सुनावणी होते. या महत्त्वाच्या पदावर नियुक्त होणारे थापर हे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत.