शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Amruallah Saleh: 'अफगाणिस्तान बळकावणं पाकला जमणार नाही, तालिबानही कुचकामी'; पंजशीर खोऱ्यातून काळजीवाहू राष्ट्रपती सालेह यांची 'गर्जना'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 14:56 IST

Amruallah Saleh: अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तान आणि तालिबानला रोखठोक आव्हान दिलं आहे.

Amruallah Saleh: अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तान आणि तालिबानला रोखठोक आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानवरतालिबानी संकट कोसळलेलं असताना राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देशातून पळ काढला. तर उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह साहेल यांनी मात्र तालिबान्यांना घाबरून देश सोडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. ते पंजशीरमध्ये आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील बहुतेक प्रांत काबिज केले आहेत. पण पंजशीर प्रांत काबीज करता आलेला नाही. यातच सालेह यांनी तालिबान आणि पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. 

"पाकिस्तानसाठी अफगाणिस्तान देश इतका मोठा आहे की ते कधीच देशाला गिळंकृत करू शकत नाहीत. तसंच तालिबान्यांना शासन लागू करण्यासाठी अफगाणिस्तान देश खूप मोठा आहे. त्यांना ते जमणार नाही", असं म्हटलं आहे. 

याला म्हणतात हिंमत! अफगाणिस्तानाचा मजबूत बालेकिल्ला; इथे घुसायला तालिबानही घाबरतो

अमरुल्लाह सालेह सध्या अफगाणिस्तानातच असून तालिबान विरोधात समर्थन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचा त्यांनी सन्मान केला आहे. "जगानं देशातील कायद्यांचं आणि शासनाचा सन्मान केला पाहिजे. हिंसेचा नव्हे. अफगाणिस्तान देश इतका मोठा आहे की पाकिस्तान कधीच गिळंकृत करू शकणार नाही. तर तालिबान कधीच त्यावर राज्य करू शकणार नाही. त्यामुळे तालिबान आणि दहशतवादी संघटनांसमोर एका देशाला गुडगे टेकावे लागतील असा पायंडा इतिहासात पाडू देऊ नका", असं आवाहन सालेह यांनी संपूर्ण जगाला केलं आहे. 

१७ ऑगस्ट रोजी काळजीवाहू राष्ट्रपतीची केली घोषणातालिबाननं काबुलवर कब्जा केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी साहेल यांनी युद्धग्रस्त प्रांताचा काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून स्वत:च्या नावाची घोषणा केली. "मी आता देशाचा काळजीवाहू राष्ट्रपती असून हा निर्णय मी कायद्याच्या चौकटीत राहून घेतलेला आहे. तत्कालीन राष्ट्रपतीच्या अनुपस्सथितीत उपराष्ट्रपती म्हणून देशाला सांभाळण्याची माझी जबाबदारी आहे", असं सालेह यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सालेह यांनी तालिबान्यांना अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याचं जाहीर केलं आणि पाकिस्तानवरही हल्लाबोल केला आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानPakistanपाकिस्तान