कैरो: इराणने शुक्रवारी अमेरिकेचे एक लढाऊ विमान (एफ-१५ इ स्ट्राइक ईगल) पाडल्यानंतर बेपत्ता असलेल्या वैमानिकाचा अमेरिकेने शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर इराणने आपल्या नागरिकांना ‘शत्रूचा वैमानिक’ शोधून त्याला पोलिसांच्या हवाली करण्याचे आवाहन केले असून, १० अब्ज इराणी तोमान (सुमारे ५५ लाख रुपये) बक्षीस देण्याचेही आश्वासन दिले आहे.
शुक्रवारी दोन विमानांवर हल्ला झाला होता, एक सैनिक सुटला, तर एक बेपत्ता झाला आहे. युद्ध आता सहाव्या आठवड्यात पोहोचत असून, अमेरिका-इस्रायल आघाडीसाठी हे युद्ध कठीण होत चालले आहे. युद्धाचा परिणाम आता जगाच्या अर्थकारणावर दिसू लागला आहे. तेलवाहतूक पूर्णतः कोलमडली आहे. इंधनाचे दर वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी इराणने दुबईमध्ये अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी ओरॅकलच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र डागले. यापूर्वी इराणने ॲमेझॉन वेब सर्व्हिसच्या यूएई व बहरीनच्या कार्यालयांवर हल्ले केले होते. या कार्यालयातून हेरगिरी चालते, असे इराणचे म्हणणे आहे.
व्हाइट हाउस आणि पेंटागॉनकडून मौन
अमेरिकेची दोन विमाने पाडण्याबाबत व्हाइट हाउस किंवा पेंटागॉनने कोणतीही सार्वजनिक माहिती दिलेली नाही; परंतु पेंटागॉनच्या एका ई-मेलमध्ये “मध्य पूर्वेत विमान पाडले गेले” अशी माहिती प्राप्त झाली आहे. एका अमेरिकी सैनिकाने स्वतःची सुटका करून घेतली; पण दुसऱ्या सैनिकाची अद्याप माहिती नसल्याचे पेंटागॉनने म्हटले आहे. इराणच्या माध्यमांनी मात्र ए-१० विमान पाडल्याचा दावा केला आहे.
हे युद्ध कठीण होत चालले आहे. युद्धाचा परिणाम आता जगाच्या अर्थकारणावर दिसू लागला आहे. तेलवाहतूक पूर्णतः कोलमडली आहे. इंधनाचे दर वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी इराणने दुबईमध्ये अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी ओरॅकलच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र डागले. यापूर्वी इराणने ॲमेझॉन वेब सर्व्हिसच्या यूएई व बहरीनच्या कार्यालयांवर हल्ले केले होते. या कार्यालयातून हेरगिरी चालते, असे इराणचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. इराणने याचे पालन केले नाही, तर होर्मुझची सामुद्रधुनी नष्ट केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सांगितले की, वेळ निघून जात आहे. यापूर्वी इराणला १० दिवसांची मुदत दिली होती, पण आता फक्त ४८ तास शिल्लक आहेत. त्यांनी इशारा दिला की, जर इराणने याचे पालन केले नाही, तर मोठ्या प्रमाणावर विध्वंस होईल. नाटो आता विश्वासार्ह भागीदार राहिला नसल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराण युद्धादरम्यान अनेक मित्र राष्ट्रांच्या भूमिकेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अणुऊर्जा केंद्रावर हल्ला
इराणच्या अणुऊर्जा आयोगाने बुशहर अणुऊर्जा केंद्रावर अमेरिका-इस्रायलने पुन्हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. बुशहरवरचा हा चौथा हल्ला असून, शनिवारच्या हल्ल्यात या केंद्रात कार्यरत एक कर्मचारी ठार झाला. या हल्ल्याबाबत अमेरिका आणि इस्रायलने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
केंद्राची वैशिष्ट्ये
बुशहर हे इराणचे एकमेव कार्यरत अणुऊर्जा केंद्र आहे, या केंद्राचे बांधकाम रशियाच्या मदतीने पूर्ण करण्यात आले आहे. रशियाने बुशहर या अणुऊर्जा केंद्रातून आपल्या कर्मचाऱ्यांचे स्थलांतर केले आहे.
भारतीय जहाजाने होर्मुझ पार केले
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर, एलपीजी वाहून आणणाऱ्या 'ग्रीन सावी' या भारतीय जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे. या जहाजात अंदाजे ४६,६५० मेट्रिक टन गॅस आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पार करणारा हा भारताचा आतापर्यंतचा सातवा एलपीजी टँकर आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आखाती प्रदेशात १८ भारतीय जहाजे आणि अंदाजे ४८५ भारतीय खलाशी आहेत. आतापर्यंत ९६४ हून अधिक भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आले आहे.
Web Summary : After Iran shot down a US fighter jet, a pilot is missing. Iran offered a reward for capturing the pilot. Tensions rise as attacks impact global economy and oil supply. Trump issued ultimatum over Hormuz Strait.
Web Summary : ईरान द्वारा अमेरिकी लड़ाकू जेट को मार गिराए जाने के बाद, एक पायलट लापता है। ईरान ने पायलट को पकड़ने के लिए इनाम की पेशकश की। वैश्विक अर्थव्यवस्था और तेल आपूर्ति पर हमलों के प्रभाव के रूप में तनाव बढ़ता है। ट्रंप ने होर्मुज जलडमरूमध्य पर अल्टीमेटम जारी किया।