वॉशिंग्टन : रशियाशी व्यापारी संबंध ठेवू नयेत, यासाठी अन्य देशांना धमकी देणाऱ्या अमेरिकेने भारत-रशिया कराराबाबत मात्र सौम्य भूमिका घेऊ न, त्या करारास आपली हरकत नसल्याचेच सूचित केले आहे. भारत व रशिया यांच्यात शुक्रवारी एस-४०० क्षेपणास्त्र खरेदीचा करार झाला.आमचे निर्बंध प्रत्यक्षात इतर देशांवर नव्हे, तर रशियाला धडा शिकवण्यासाठी आहेत. अन्य देशांच्या लष्करी क्षमतेचे नुकसान करण्याचा आमचा अजिबात इरादा नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने अशी भूमिका घेत, रशियाकडूनही क्षेपणास्त्रे घेण्याचे ठरविल्याबद्दल भारताला अडचणीत न आणण्याचेच स्पष्ट केले आहे. व्हाईट हाऊ सनेम्हटले आहे की, शस्त्र खरेदीबाबत आधीच झालेले निर्णय यासंदर्भात अमेरिका निर्बंध आणू इच्छितनाही. (वृत्तसंस्था)घातक व्यवहारांसाठी आहेत निर्बंधट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे की, अमेरिकेच्या हितसंबंधांच्या विरोधात जाणा-यांवर निर्बंध आणण्यासाठीच्या सीएएटीएसए या कायद्याच्या कलम २३१ अन्वये आम्ही या कराराकडे पाहत आहोत. या व्यवहारांमध्ये प्रत्यक्ष रशियाच्या संरक्षणासाठीच्या निधीवर निर्बंध आणण्याचाही समावेश आहे.
रशियन क्षेपणास्त्रे घेण्याच्या भारताच्या कराराबाबत अमेरिकेची भूमिका सौम्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 23:37 IST