इराणच्या भूमीवर कोसळलेल्या अमेरिकन F-15E स्ट्राईक ईगल विमानातील वेपन्स ऑफिसरला वाचवण्यासाठी अमेरिकेने जगातील सर्वात धाडसी मोहीम राबवली. मात्र, या मोहिमेच्या यशामागे केवळ अमेरिकन कमांडोजच नव्हते, तर इस्रायलची सर्वात घातक आणि गुप्त मानली जाणारी 'सायरेत मतकल' ही विशेष तुकडी देखील इराणमध्ये घुसली होती, असा खळबळजनक खुलासा झाला आहे.
इस्रायली डिफेन्स फोर्सेसची ही एक अशी एलीट युनिट आहे, जिच्याबद्दल मोसादइतकी चर्चा होत नाही, पण तिची ताकद अफाट आहे. १९५७ मध्ये या दलाची स्थापना करण्यात आली. शत्रूच्या हद्दीत खोलवर शिरून गुप्त माहिती काढणे, ओलीस ठेवलेल्यांची सुटका करणे आणि हाय-प्रोफाईल दहशतवादविरोधी कारवाया करणे यात ही तुकडी माहीर आहे. ही तुकडी ब्रिटीश आर्मीच्या 'SAS' च्या धर्तीवर तयार करण्यात आली असून, तिचे ब्रीदवाक्य "Who Dares Wins" (जो धाडस करतो तोच जिंकतो) हे आहे.
अमेरिकन वैमानिकाला वाचवण्यासाठी असा रचला सापळारिपोर्ट्सनुसार, अमेरिकन वैमानिकाचा शोध घेण्यासाठी इराणने मोठी बक्षीसे जाहीर केली होती आणि त्यांचे सैन्य डोंगराळ भागात पोहोचले होते. अशा वेळी इस्रायलच्या 'सायरेत मतकल' आणि 'शालदाग' (Shaldag - हवाई दलाची विशेष तुकडी) या दोन युनिट्सनी अमेरिकेला मदत केली. ज्या ठिकाणी वैमानिक अडकला होता, त्या ठिकाणावरून इराणचे लक्ष हटवण्यासाठी इस्रायलने इराणच्या इतर तळांवर हल्ले केले. सीआयएने इराणमध्ये अशी अफवा पसरवली की वैमानिकाला आधीच बाहेर काढण्यात आले आहे, ज्यामुळे इराणी सैन्याची दिशाभूल झाली.
प्रत्यक्ष रेस्क्यूअखेर डोंगराच्या कपारीत लपलेल्या वैमानिकाला इस्रायली गुप्तचर माहितीच्या आधारे अमेरिकन कमांडोजनी सुखरूप बाहेर काढले.
नेतान्याहू यांचा अभिमानइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या मोहिमेनंतर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "युद्धभूमीच्या आत आणि बाहेर अमेरिका-इस्रायलचे सहकार्य अभूतपूर्व आहे. एका शूर अमेरिकन योद्ध्याचा जीव वाचवण्यासाठी इस्रायलने योगदान दिले, याचा मला अभिमान आहे."
Web Summary : A daring US rescue mission in Iran to save a downed pilot involved Israel's elite Sayeret Matkal unit. The secretive force, known for covert ops and hostage rescues, aided the US, distracting Iranian forces with attacks and misinformation, leading to the pilot's safe extraction.
Web Summary : ईरान में एक अमेरिकी पायलट को बचाने के साहसी अभियान में इजरायल की विशेष इकाई 'सायरेत मतकल' शामिल थी। गुप्त अभियानों और बंधक बचाव के लिए जानी जाने वाली इस इकाई ने हमलों और गलत सूचनाओं से ईरानी सेना को भ्रमित कर अमेरिकी पायलट को सुरक्षित निकालने में मदद की।