शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अमेरिकेचा पाकला आणखी एक दणका! सुरक्षा सहाय्यही थांबवण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:48 AM

दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे, यासाठी अमेरिकने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे.

वॉशिंग्टन - दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे, यासाठी अमेरिकने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानला पुरवण्यात येणारी सुरक्षा मदत थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी दिली.  'पाकिस्तान जोपर्यंत तालिबानी दहशतवादी संघटना, हक्कानी नेटवर्क यांसारख्या अशांतता पसरवणाऱ्या आणि अमेरिकी नागरिकांना इजा पोहोचवणाऱ्या घटकांविरोधात निर्णायक कारवाई करणार नाही, तोपर्यंत अमेरिका पाकिस्तानला कोणतेही सुरक्षा सहाय्य पुरवणार नाही. या अंतर्गत ट्रम्प सरकार पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवू शकते. मात्र, रक्कम सरकारला अन्य ठिकाणी वळवता येणार नाही. जेणेकरून परिस्थिती सुधारल्यानंतर या निधीचा पुन्हा वापर करता येईल', असेही हीथर नोर्ट यांनी सांगितले. 

अमेरिकेनं दिला होता इशारा

व्हाइट हाउसच्या प्रसारमाध्यम सचिव साराह सँडर्स यांनी सांगितले की, दहशतवादी कारवाया थांबविण्यासाठी पाकने आणखी प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे पाकवर दबाव वाढविण्यासाठी अमेरिका आणखी निर्बंध लादणार आहे. गेल्या पंधरा वर्षांत अमेरिकेने पाकला केलेली ३३ अब्ज डॉलरची मदत हा मूर्खपणा होता. या काळात पाक मात्र अमेरिकेशी खोटेपणाने व कपटी वृत्तीने वागला, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. अमेरिकेने पाकची २५५ दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत रोखली आहे.  

 

आमच्या भूमीवरून ५७८०० हल्ले - पाकपाकिस्तानच्या तळांवरून अमेरिकी फौजांनी आजवर अफगाणिस्तानवर ५७,८०० हल्ले चढविले. अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धात असंख्य पाकिस्तानी नागरिक व सैनिकांनी जीव गमावला. पाकने अमेरिकेसाठी काय केले म्हणून तुम्ही कसे विचारता, अशा शब्दांत पाकचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असीफ यांनी अमेरिकेवर आगपाखड केली आहे.अमेरिकेने मर्यादा ओलांडल्या - इराणइराणमध्ये सरकारच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या निदर्शकांना पाठिंबा जाहीर करून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय संबंधांतील सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे, अशी टीका इराणने केली आहे. ट्रम्प यांच्या टिष्ट्वटमुळे इराणमधील परिस्थिती आणखी चिघळली, असाही आरोप इराणने केला. इराणचे राजदूत गुलामअली खुश्रू यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे अध्यक्ष व संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँतोनिओ गुटेरेस यांना पत्र लिहून, अंतर्गत बाबींमध्ये अमेरिका हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही केला आहे.

टॅग्स :USअमेरिकाPakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पTerrorismदहशतवाद