शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर अमेरिकेची टिप्पणी! पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भातही केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 14:31 IST

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात 'तेजीने वाढत असलेल्या हिंदू राष्ट्रवादा'च्या मुद्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. याला उत्तर देताना ब्लिंकन म्हणाले, 'या मुद्यावर भारत आणि अमेरिका राजकीय पातळीवर सातत्याने बोलत आले आहेत. याच बरोबर आमच्या चर्चेत लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दाही असतो.'

अमेरिकन परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या (WEF) वार्षिक बैठकीत पुन्हा एकदा भारताच्या मानवाधिकार आणि हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ब्लिंकन म्हणाले, यामुद्द्यावर अमेरिकेने नेहमीच भारतासोबत चर्चा केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताने जे यश संपादन केले आहे, ती असाधारण यशाची कहाणी आहे.

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात 'तेजीने वाढत असलेल्या हिंदू राष्ट्रवादा'च्या मुद्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. याला उत्तर देताना ब्लिंकन म्हणाले, 'या मुद्यावर भारत आणि अमेरिका राजकीय पातळीवर सातत्याने बोलत आले आहेत. याच बरोबर आमच्या चर्चेत लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दाही असतो.'

'राष्ट्रपती (ज्यो बायडेन) यांनी पदभार स्वीकारला, तेव्हाच अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मानवाधिकार आणि लोकशाही संदर्भातील चिंता या दोन गोष्टी महत्व देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केला होता. यासंदर्भात आम्ही वेगवेगळ्या देशांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आलो आहोत. काही देशांसोबत अशी चर्चा अधिक बोलकी असते. तर, काही देशांसोबत आमचे संबंध लक्षात घेता, खुलेपणाने चर्चा केली जाते. ज्याचे सकारात्मक परिणामही दिसून येतात. हीच स्थिती भारताची आहे, असे ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

भारताच्या कामगिरीचं केलं कौतुक -ब्लिंकन यांनी मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली आणि भारताच्या यशाची ही एक विलक्षण यशोगाथा असल्याचे म्हटले आहे. भारताच्या आर्थिक विकासाचा उल्लेख करताना ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवलेले हे विलक्षण यश आपण पाहत आहोत.' एवढेच नाही तर, भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख समर्पित होऊन काम करत आहेत, असेही ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतHinduismहिंदुइझम