अमेरिकन सैनिक ठार
By Admin | Updated: April 9, 2017 05:05 IST2017-04-09T02:13:47+5:302017-04-09T05:05:31+5:30
पूर्व अफगाणिस्तानच्या नानगरहार प्रांतामध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या नाटोच्या सैन्य कारवाई दरम्यान एक

अमेरिकन सैनिक ठार
>ऑनलाइन लोकमत
काबुल, दि. 09 - पूर्व अफगाणिस्तानच्या नानगरहार प्रांतामध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या नाटोच्या सैन्य कारवाई दरम्यान एक अमेरिकन सैनिक ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. ठार झालेला सैनिक विशेष तुकडीचा सदस्य होता. या वृत्तास अमेरिकेच्या सैन्य अधिका-याने दुजोरा दिला आहे.