हवामान बदलाचा अमेरिकी सुरक्षेस धोका
By Admin | Updated: May 21, 2015 00:41 IST2015-05-21T00:41:26+5:302015-05-21T00:41:26+5:30
हवामान बदलामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. हवामान बदलामुळे देशातील गरिबी, तसेच दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यता आहे.

हवामान बदलाचा अमेरिकी सुरक्षेस धोका
वॉशिंग्टन : हवामान बदलामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. हवामान बदलामुळे देशातील गरिबी, तसेच दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यता आहे. अन्न व पाणी यासारख्या संसाधनासंदर्भात वाद निर्माण झाल्याने राजकीय अस्थिरताही येईल, असे व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.
हवामान बदलामुळे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा लगेचच धोक्यात येऊ शकते. या बदलामुळे नैसर्गिक आपत्ती वाढणार असून, मानवी जीवन संकटात येऊ शकते. त्यामुळे विस्थापितांचा ओघ वाढून, अन्न व पाणी यासारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष होईल, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
हा अहवाल राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हवामान बदलावरील भाषणाआधी प्रसिद्ध केला आहे. ओबामा यांचे हे भाषण अत्यंत महत्त्वाचे मानण्यात येत आहे. हवामान बदल हा अमेरिकेच्या दृष्टीने तातडीचा, वाढता धोका आहे. तीव्र हवामानामुळे निर्वासितांचा ओघ वाढणार आहे, अन्न व पाणी यासारख्या बाबींसाठी संघर्ष वाढणार आहे. (वृत्तसंस्था)
बदलणाऱ्या हवामानामुळे संपूर्ण जगात अस्थैर्य निर्माण होईल. पाणी व अन्न यांची टंचाई, नैसर्गिक संसाधनात स्पर्धा, अविकसित, मागास देश तसेच लोकसंख्येत अतिवाढ असे संकटाचे स्वरूप असेल.
संसर्गजन्य रोगाची साथ
हवामान बदल व जागतिक वास्तव, नागरिकांचे शहरीकरण यामुळे घरे, जमिनी व पायाभूत सेवा उद्ध्वस्त होतील. हवामान बदलामुळे पाण्याची टंचाई वाढेल. अन्नधान्य महाग होईल. जागतिक अर्थव्यवस्थेवरील समाजावरील तसेच सरकारवरील दबाव वाढेल, तसेच हवामान बदलामुळे जागतिक पातळीवर संसर्गजन्य रोगाची साथही पसरण्याचा धोका आहे.