शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:45 IST

Donald Trump Warns Iran: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला.

वॉशिंग्टन:इराणवरइस्रायलने केलेल्या हल्ल्यांशी अमेरिकेचा काही संबंध नाही. आमच्या वाटे जाऊ नका. या संघर्षात इराणने अमेरिकी ठिकाणांवर कोणत्याही प्रकारे हल्ले केले, तर अमेरिकी फौजा अक्षरश: तुटून पडतील. मग असे हाल करू की, यापूर्वी कधीच इराणचे कधीच झाले नसतील, अशा शब्दांत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी दोन्ही देशांत मध्यस्थी करण्याचा प्रस्तावही दिला आहे. हा रक्तरंजीत संघर्ष थांबवण्यासाठी इस्रायल-इराण यांच्यात सहज युद्धबंदी करार घडवून आणू, असे त्यांनी म्हटले आहे. असे असले तरी  इराणने इस्रायलवर हल्ले सुरूच ठेवले असून, यात मोठे नुकसान झाले आहे.

इस्रायल-इराण संघर्षावर तोडगा काढण्यासाठी करार घडवून आणण्याचा प्रस्ताव देताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचे श्रेय घेतले आहे. या दोन देशांना जसे थांबायला सांगितले, तसेच इस्रायल-इराणच्या दोन प्रमुख नेत्यांत चर्चा घडवून आणू आणि शांततेचा मार्ग काढू, असे ट्रम्प यांनी म्हटले.

भारतीयांना सुरक्षित आणा: काँग्रेसइस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी भारत सरकारने व्यवस्था करावी, अशी मागणी जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तारिक हमीद यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे केली आहे.

इस्रायल भयंकर हल्ले करण्याची शक्यताइराणमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांनी तेथील शस्त्रास्त्र कारखान्यांतून तत्काळ बाहेर पडावे, असा इशारा इस्रायलने पारशी भाषेत दिला आहे. या इशाऱ्यामुळे इस्रायल आता या लक्ष्यांवर भयंकर हल्ले करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

...तर प्रत्युत्तरादाखल हल्ले थांबवूइस्रायलने सुरू केलेले हल्ले थांबवले, तर इराणही प्रत्युत्तरादाखल हल्ले थांबवेल, असे या देशाचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे. रविवारी तेहरानमध्ये अराघची यांनी हा प्रस्ताव दिला. शुक्रवारी इस्रायलने हल्ले सुरू केल्यानंतर प्रथमच ते समोर आले आहेत. इस्रायलने त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

इस्रायली गुप्तहेर खोलवर घुसलेइस्रायलचे गुप्तहेर इराणमध्ये खोलवर घुसले असून, यामुळेच लष्कराचे अधिकारी आणि शास्त्रज्ञांना इस्रायलने सहज लक्ष्य केले. या गुप्तहेरांना शोधणे इराणला अजून शक्य झालेले नाही.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पwarयुद्धIranइराणIsraelइस्रायल