अमेरिकेतील भारतीयांचा दानशूरपणा
By Admin | Updated: July 5, 2015 22:41 IST2015-07-05T22:41:41+5:302015-07-05T22:41:41+5:30
बिहारमध्ये २०० खाटांचे अत्याधुनिक सुपर स्पेशलाईज्ड नेत्र रुग्णालय उभारण्यासाठी कॅलिफोर्निया येथे आयोजित एका निधी जमविण्याच्या कार्यक्रमात अनिवासी भारतीयांनी ७५ हजार डॉलर्स जमवले.

अमेरिकेतील भारतीयांचा दानशूरपणा
वॉशिंग्टन : बिहारमध्ये २०० खाटांचे अत्याधुनिक सुपर स्पेशलाईज्ड नेत्र रुग्णालय उभारण्यासाठी कॅलिफोर्निया येथे आयोजित एका निधी जमविण्याच्या कार्यक्रमात अनिवासी भारतीयांनी ७५ हजार डॉलर्स जमवले. शंकर आय फाऊंडेशन व अमेरिकेतील बिहार फाऊंडेशनने बिहारमधील या रुग्णालयासाठी ४० लाख डॉलर्स जमविण्याचा निर्धार केला आहे. बिहारमधील या रुग्णालयात दरवर्षी २५ हजार मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
या फाऊंडेशनतर्फे जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सॅनफ्रान्सिस्को बे भागातील कुपरटिनो कम्युनिटी हॉलमध्ये निधी जमविण्याचा कार्यक्रम आयोजत करण्यात आला होता. बिहार फाऊंडेशनच्या वार्षिक कार्यक्रमाला अमेरिकेतील नामवंत बिहारी नागरिक जमले होते.