शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडे होती भाजपावर हेरगिरीची जबाबदारी- विकिलीक्स

By admin | Updated: April 11, 2017 09:11 IST

भारतातल्या भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजपा या राजकीय पक्षाचा आणि पाकिस्तानमधल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचासुद्धा समावेश असल्याचा दावा व्हिसलब्लोअर वेबसाइट विकिलिक्सनं केला

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 11 - युनायटेड स्टेट्स नॅशनल सिक्युरिटी एजन्सी(NSA)ला परराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या हेरगिरीचं काम सोपवण्यात आलं असून, ज्यात भारतातल्या भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजपा या राजकीय पक्षाचा आणि पाकिस्तानमधल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचासुद्धा समावेश असल्याचा दावा व्हिसलब्लोअर वेबसाइट विकिलिक्सनं केला आहे. तसेच युनायटेड स्टेट्स नॅशनल सिक्युरिटी एजन्सीनं पाकिस्तानमधल्या मोबाईल नेटवर्कची सिस्टीम हॅक केल्याचा खुलासाही विकिलीक्सनं रिपोर्टमध्ये केला आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, अमेरिकेला फॉरन इन्टेलिजन्स सर्वेलन्स कोर्टानं (FISA) 2010मध्ये हेरगिरी करण्यासाठी प्रमाणपत्र बहाल केलं होतं. त्यानुसार जगभरातील 193 सरकारे आणि परदेशी गट, राजकीय संघटना आणि इतर घटकांची हेरगिरी करण्याची अमेरिकेला परवानगी मिळाली होती. मात्र ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांची हेरगिरी करण्याचा अधिकार अमेरिकेकडे नव्हता. त्याप्रमाणेच तुर्कस्थानातील उत्तरी गणराज्यांवरही अमेरिका हेरगिरी करत असल्याचं विकिलिक्सनं म्हटलं आहे. एनएसएला संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी, विश्व बँक आणि आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष यांसारख्या संस्थांच्या हेरगिरीचं काम देण्यात आलं होतं, असा दावाही विकिलीक्सनं केला आहे.