परप्रांतीय भारतीयांविरोधात एकवटले अमेरिकन भूमिपुत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 16:17 IST2017-03-03T14:23:03+5:302017-03-03T16:17:17+5:30
डेमोक्रॅटिक पक्षाच्या जीनी ग्रीन आणि रिपब्लिकन पक्षाच्या डेव्हीड किनले यांनी हे विधेयक सादर केले आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातंर्गत अमेरिकन कंपन्यांना...

परप्रांतीय भारतीयांविरोधात एकवटले अमेरिकन भूमिपुत्र
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 3 - नोक-यांचे परदेशात आऊटसोर्सिंग करण्याविरोधातील विधेयक गुरुवारी पुन्हा अमेरिकन काँग्रेसमध्ये सादर करण्यात आले. ज्या कंपन्या आपले कॉल सेंटर परदेशात सुरु करतात त्यांना ग्रांट आणि सरकारी कर्जासाठी अपात्र ठरवण्याची तरतुद या विधेयकात करण्यात आली आहे. अमेरिकेतून नोक-या बाहेर जाऊ नये हा या विधेयकामागे उद्देश आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या जीनी ग्रीन आणि रिपब्लिकन पक्षाच्या डेव्हीड किनले यांनी हे विधेयक सादर केले आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातंर्गत अमेरिकन कंपन्यांना नोक-या परदेशात नेण्यापासून रोखता येईल असे या दोघांचे म्हणणे आहे. ज्या कंपन्यांची परदेशात कॉल सेंटर सुरु आहेत त्यांना फेडरल ग्रांट आणि कर्ज मिळू नये तसेच कॉल सेंटरमधल्या कर्मचा-याला तो कठल्या देशातून बोलतोय ते सांगावे लागेल आणि अमेरिकन ग्राहकांच्या विनंतीनुसार मार्गदर्शन करणारा कर्मचारी अमेरिकतेच असला पाहिजे अशा मागण्या त्यांनी विधेयकातून केल्या आहेत.
2013 मध्ये अशाच पद्धतीचे विधेयक सादर करण्यात आले होते. दुर्देवाने अमेरिकन कंपन्यांमधील कॉल सेंटरच्या नोक-या मोठया प्रमाणात भारत, फिलीपाईन्स देशांमध्ये आहेत. या विधेयकामुळे नोक-या अमेरिकेतच राहतील आणि नागरीकांना फायदा होईल असे या दोघांचे म्हणणे आहे.