शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

अमेरिकेनं भारताला परत केल्या २४८ प्राचीन वस्तू; १२ व्या शतकातील नटराजाच्या मूर्तीचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 09:24 IST

Authorities Return 248 Antiquities to India : या वस्तूंमध्ये १९६० मध्ये भारतातील एका मंदिरातून चोरी झालेल्या १२ व्या शतकातील कांस्य नटराज मूर्तीचाही समावेश आहे.

अमेरिकेनं गुरुवारी भारताला अनेक प्राचीन वस्तू परतकेल्या. या सर्व अशा वस्तू आहेत ज्यांची अनेक वर्षांपूर्वी चोरी करण्यात आली होती. आता अमेरिकेनं त्या वस्तू भारताला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण २४८ वस्तूंचा समावेश आहे आणि त्यांची किंमत जवळपास दीड कोटी डॉलर्स असल्याचं म्हटलं जात आहे. 

या वस्तूंमध्ये १२ व्या शतकातल्या कांस्य नटराज मूर्तीचाही समावेश आहे. भारतातील एक मंदिरातून १९६० मध्ये ही मूर्ती चोरण्यात आली होती. त्यानंतर एका आरोपीनं ती न्यूयॉर्कमध्ये विकली होती. पपरंतु आता अमेरिकन एजन्सींनी या किंमती वस्तू जप्त केल्या आहेत आणि त्या भारताला परत करण्याचं कामही केलं आहे. नटराजाच्या मूर्तीशिवाय कांस्य नंदिकेश्वर आणि कांस्य कंकलमूर्तीदेखील चोरी करण्यात आली होती. हे सर्व आता भारताला परत करण्यात आलं आहे. 

या सर्व प्रक्रियेबाबत मॅनहॅटनचे डिस्ट्रिक्ट अॅटर्नी सी वान्स यांनी प्रतिक्रिया दिली. "गेल्या एका दशकात पाच निरनिराळ्या गुन्हेगारी तपासादरम्यान अनेक किंमती वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. या भारतातील प्राचीन कलाकृती असल्याचं सांगण्यात आलं आहे," असं ते म्हणाले. या वस्तू भारताला परत केल्यानंतर भारतानंही अमेरिकेचे आभार मानले आहेत. यापुढेही भारत आणि अमेरिकेचे संबंध असेच पाहायचे आहेत ज्यामुळे दोन्ही देशांमद्ये सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत होतील, अशी प्रतिक्रिया भारताचे काऊन्सल जनरल रणधीर जयस्वाल यांनी दिली.

चोरी करून विकल्या जात होत्या वस्तूयापूर्वीही अमेरिकेनं भारताला प्राचीन वस्तू परत केल्या होत्या. परंतु मोठ्या प्रमाणात वस्तू परत करण्याचं काम पहिल्यांदा होत आहे. ज्या २४८वस्तू परत केल्या गेल्या आहेत, त्यापैकी २३५ वस्तू आर्ट डीलर सुभाष कपूरकडून मिळाल्या आहेत. सध्या तो तुरूगांत बंद आहे. याशिवाय त्याच्या अन्य एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. त्यानं भारताशिवाय, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, थायलंड सारख्या देशातून सामान चोरलं होतं.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत