‘अमेरिकेने मंदीवर विजय मिळविला’
By Admin | Updated: January 21, 2015 23:51 IST2015-01-21T23:51:25+5:302015-01-21T23:51:25+5:30
अमेरिका मंदीच्या वर्तुळातून बाहेर पडली, आपण मंदीवर विजय प्राप्त केला आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले.

‘अमेरिकेने मंदीवर विजय मिळविला’
वॉशिंग्टन : अमेरिका मंदीच्या वर्तुळातून बाहेर पडली, आपण मंदीवर विजय प्राप्त केला आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले.
ओबामा प्राईम टाईम स्टेट आॅफ द युनियन कार्यक्रमात ते बोलत होते. देशात अशा आर्थिक धोरणांना पुढे न्यायची गरज आहे जे मध्यम वर्गाला मदत अन् श्रीमंतांना लक्ष्य करील. जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था खर्चिक अशा युद्धाच्या काळाला मागे टाकून पुढे निघून आली आहे. अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून १९९९ नंतर सगळ्यात वेगाने रोजगार संधी निर्माण करीत आहे. जगात आर्थिक संकट सुरू होण्याआधी बेरोजगारीचा जो दर होता, त्यापेक्षाही आजचा बेरोजगारीचा दर कमी आहे.
ओबामा म्हणाले, ‘वाढती अर्थव्यवस्था, कमी होणारी राजकोषीय तूट, वेगाने वाढणारे उद्योगधंदे व वाढते ऊर्जा उत्पादन हे सगळे बघता आम्ही मंदीतून बाहेर पडलो आहोत आणि आता आम्ही कोणत्याही देशाच्या तुलनेत आपले भविष्य आम्हीच घडवू शकतो.’
जागतिक मंदीमुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. तेथील शेअर बाजाराला सावरण्यासाठी अमेरिकेच्या फेडर रिझर्व्हने काही वर्षे नियमित बाँडखरेदी केली. त्यापोटी अब्जावधी डॉलर अर्थव्यवस्थेत ओतले. या खरेदीचा जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला. या मंदीने अमेरिकेला पुन्हा एकदा जगातील एकमेव आर्थिक महासत्ता म्हणून मान्यता मिळवून दिली आहे.