अमेरिका पाकला देणार ३४ कोटी डॉलरची शाबासकी
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-25T01:13:32+5:302015-07-25T01:13:32+5:30
अमेरिका उत्तर वजिरिस्तानातील यशस्वी लष्करी मोहिमेबद्दल पाकिस्तानला ३३.७ कोटी डॉलरची शाबासकी देऊ शकतो.

अमेरिका पाकला देणार ३४ कोटी डॉलरची शाबासकी
इस्लामाबाद : अमेरिका उत्तर वजिरिस्तानातील यशस्वी लष्करी मोहिमेबद्दल पाकिस्तानला ३३.७ कोटी डॉलरची शाबासकी देऊ शकतो.
पाकिस्तानला अमेरिकन आघाडी सहकार्य निधीतून (सीएसएफ) हे साहाय्य मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकन सरकारने सीएसएफ निधीबाबतची अधिूसचना यापूर्वीच काँग्रेसला दिली असून या आठवडाअखेर १५ दिवसांचा बंधनकारक नोटीस कालावधी संपल्यानंतर पाकला ही रक्कम दिली जाईल.
३० जूनपूर्वीच साहाय्य मिळेल, अशी आशा पाकला होती. हे साहाय्य अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करून तूट कमी करण्याचे त्याचे प्रयत्न होते; मात्र अमेरिकेकडून निधी देण्यास झालेल्या विलंबामुळे पाकच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. मात्र आता हा
निधी लवकरच मिळण्याची चिन्हे आहेत. (वृत्तसंस्था)