अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाशी संबंधित आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक असलेल्या महिला नेत्या वेलेंटिना गोमेझ यांनी पुन्हा एकदा एक प्रक्षोभक विधान करत वादाला तोंड फोडलं आहे. ब्रिटनमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी हे वादग्रस्त भाषण केलं आहे. अमेरिका आणि युरोपमधून इस्लामला संपुष्टात आणणं हा आमचा हेतू आहे, असा इशारा वेलेंटिना गोमेझ यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमधून दिला आहे. दरम्यान, गोमेझ यांच्या या चिथावणीखोर भाषेमुळे ब्रिटनबरोबरच जगभरातील स्थलांतरीत आणि धार्मिक भावनांबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आळा आहे. ब्रिटनमधील कट्टरतावादी कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलताना वेलेंटिना गोमेझ यांनी वादग्रस्त विधानं केलं. एवढंच नाही तर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यावरही हल्लाबोल कर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांचा उल्लेख पीडोफाईलचं संरक्षण करणारा, असा केला.
एवढंच नाही तर गोमेज यांनी सभेमध्ये उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सरकारच्या आदेशांचं पालन न करण्याचे आवाहन केले. त्यांच्या स्वत:च्या देशामध्ये बलात्कार होत असताना पोलिसांना दुसऱ्या प्रकरणांकडे पाहण्यास सांगितलं जात आहे. यावेळी गोमेज यांनी मुस्लिमांचा उल्लेख उघडपणे बलात्कारी असा केला. तसेच याविरोधात उभे राहण्याचं आणि लढण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. आता नाही तर कधीच नाही, असा हा काळ आहे, असेही त्या म्हणाल्या.
गोमेज यांनी मुस्लिमांना लक्ष्य करत केलेल्या भाषणामध्ये पुढे ब्रिटिश लोकांना आवाहन केलं की, जर या बलात्कारी मु्स्लिमांनी ब्रिटनवर कब्जा केला तर ते केवळ तुमच्या महिलांवर बलात्कारच करणार नाहीत तर तुमच्या मुलांचा शिरच्छेदही करतील. जसे त्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्राइलमध्ये केले होते. त्यामुळे आपण लढलं पाहिजे नाही तर मरण स्वीकारलं पाहिजे. आम्ही योद्धे आहोत. आम्ही येशू ख्रिस्ताचे योद्धे आहोत.
सध्या ब्रिटनला ज्याच्यामध्ये ब्रिटिश लोकांसाठी उभे राहण्याची हिंमत असेल. तसेच जो या बलात्कारी मुस्लिमांना परत त्यांच्या शरिया देशामध्ये पाठवू शकेल, अशा पंतप्रधानाची आवश्यकता आहे, असेही वेलेंटिना गोमेझ म्हणाल्या. वेलेंटिना गोमेज या आधीही वादाच्या बोवऱ्यात सापडल्या आहेत. कुराण जाळल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. तसेच याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर जगभरातून टीका झाली होती.