शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

"अमेरिकेनं आपल्याला टॉयलेट पेपरसारखं वापरलं अन् फेकून दिलं"; पाकिस्तानचे संरक्षणमंत्री भरसंसदेत काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 03:38 IST

ख्वाजा आसिफ म्हणाले, अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोन्ही युद्धांमध्ये पाकिस्तानने इस्लामच्या संरक्षणासाठी काहीही केले नाही. उलट, अफगाण युद्धात पाकिस्तानी नागरिकांना 'जिहाद'च्या नावाखाली मरण्याच्या दारात ढकलले. यातून पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये तालिबानचा उल्लेख करत अमेरिकेवर थेट निशाणा साधला. ख्वाजा आसिफ म्हणाले, अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोन्ही युद्धांमध्ये पाकिस्तानने इस्लामच्या संरक्षणासाठी काहीही केले नाही. उलट, अफगाण युद्धात पाकिस्तानी नागरिकांना 'जिहाद'च्या नावाखाली मरण्याच्या दारात ढकलले. यातून पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही.

अमेरिकेनं टॉयलेट पेपरप्रमाणे वापरलं आणि फेकून दिलं -ख्वाजा आसिफ म्हणाले, या युद्धांचे समर्थन करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातही बदल केले, ज्यांत आजही सुधारणा झालेली नाही. १९९९ नंतर केवळ अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी, पाकिस्तान पुन्हा एकदा युद्धात सामील झाला. त्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागली. या निर्णयांसाठी माजी लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर निशाणा साधताना आसिफ म्हणाले, "पाकिस्तानचा वापर टॉयलेट पेपरप्रमाणे केला आणि काम झाल्यानंतर फेकून दिले."

'ती' एक मोठी चूक होती -आसिफ पुढे म्हणाले, "या चुकीच्या निर्णयांनी पाकिस्तानला इतरांच्या युद्धातील 'मोहरा' बनवले. १९८० च्या दशकात अमेरिकेने रशियाविरुद्धअफगाणिस्तानात बंड घडवून आणले होते. त्या वेळी, पाकिस्तान सरकारला अमेरिकन 'कुबड्यांचा' आधार हवा होता. यामुळे, आपण आपल्या लोकांना या युद्धात लोटले, ती एक मोठी चूक होती."

याची भरपाई कधीही होऊ शकत नाही -तालिबानने रशियाविरुद्ध पुकारलेल्या युद्धाला 'जिहाद' नाव दिले. मात्र तो जिहाद नव्हता, कारण रशियाने अफगाणिस्तानवर कब्जा केलेला नव्हता, असेही आसिफ यांनी स्पष्ट केले. "२००१ मध्येही आपण अमेरिकेसाठी तालिबानच्या विरोधात गेलो. अमेरिका तर निघून गेली, पण आपण आजही याचे चटके भोगतोय. याची भरपाई कधीही होऊ शकत नाही," असेही आसिफ यावेळी म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan slams US: Used us like toilet paper, then discarded.

Web Summary : Pakistani Defence Minister Khawaja Asif criticized America in Parliament, stating Pakistan was exploited in Afghanistan wars and then discarded like used toilet paper. He highlighted past mistakes of supporting US-led conflicts, leading to lasting repercussions for Pakistan, which continues to suffer.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिकाrussiaरशिया