शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पेंग्विनकडून शुल्क वसूल करणार? जिथे कुणीच राहत नाही, ट्रम्प यांनी तिथेही 10 टक्के शुल्क लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:08 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी जगभरातील 180 देशांवर परस्पर शुल्क लागू केले आहे.

America Tariff : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रेसिप्रोकल टॅरिफ लागून करुन जगभरातील अनेक देशांना मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी आजच्या दिवसाचे नामकरण 'लिबरेशन डे' असे केले असून, विविध देशांकडून आकारण्यात येणाऱ्या टॅरिफची घोषणा केली आहे. या दरम्यान, अंटार्क्टिकाजवळील ऑस्ट्रेलियन बेटावरही अमेरिकेने 10 टक्के टॅरिफ लागू केले आहे. विशेष म्हणजे, या बेटावर एकही माणूस राहत नाही.

अमेरिकेचे पेंग्विनवर शुल्क?ऑस्ट्रेलियन सरकारच्या अखत्यारीतील हर्ड आयलंड आणि मॅकडोनाल्ड बेट हे पृथ्वीवरील सर्वात निर्जन ठिकाणांपैकी एक मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातून बोटीने दोन आठवड्यांच्या प्रवासानंतर येथे पोहोचता येते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या दशकभरात येथे एकाही मानवाने पाऊल ठेवले नाही. येथे मानव राहत नाही, तर पेंग्विन, सील आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांचे निवासस्थान आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी या दोन बेटांवर शुल्क का लादले? पेंग्विनवर शुल्क लादले का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

ऑस्ट्रेलियाची प्रतक्रियाऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले की, या पृथ्वीवर कोणीही सुरक्षित नाही. ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफमध्ये कोणतेही तर्क नाही. हे मित्र राष्ट्राचे वर्तन असू शकत नाही. यादरम्यान अल्बानीज यांनी असेही सांगितले की, ऑस्ट्रेलिया प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेवर कोणत्याही प्रकारचे परस्पर शुल्क लादणार नाही. आम्ही अशा आंधळ्या शर्यतीत सहभागी होणार नाही, जिथे किमती गगनाला भिडतील आणि वाढ रसातळाला जाईल. 

अमेरिकेने 180 देशांवर शुल्क लादलेअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये मीडियाला संबोधित करताना जगभरातील 180 देशांवर परस्पर शुल्क लागू केले. यावेळी ते म्हणाले की, आम्ही अमेरिकेला पुन्हा समृद्ध करू. यादरम्यान ट्रम्प यांनी भारत, चीन, युरोपियन युनियन, जपान, तैवान, दक्षिण कोरिया, बांग्लादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानसह अनेक देशांचे तक्ते दाखवले आणि त्यांच्यावर शुल्क लागू करण्याची घोषणा केली.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाAustraliaआॅस्ट्रेलियाIndiaभारत