शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानसोबत ऐतिहासिक शांतता करार,अमेरिकी सैन्स १४ महिन्यांत अफगाणिस्तान सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 19:45 IST

Afghan Peace Deal : 11 सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानविरुद्ध पुकारले होते युद्ध. तेव्हापासून अफगाणिस्तान युद्धात युद्धाच्या ज्वाळात होरपळत आहे.

दोहा (कतार) - गेल्या १९ वर्षांपासून युद्धात होरपळत असलेल्या अफगाणिस्तानमध्ये शा्ंतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या. दरम्यान, तालिबाने शांतता कराराचे पालन केल्यास येत्या १४ महिन्यांच्या आत अमेरिकाअफगाणिस्तानमधून आपल्या सर्व सैनिकांना माघारी बोलावेल, अशी घोषणा अमेरिकेने केली आहे.

अमेरिका आणि तालिबान यांच्यात कतारची राजधानी दोहा येथे आज हा ऐतिहासिक शांतता करार झाला.  या कराराचे साक्षीदार होण्यासाठी ३० विविध देश आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. करारावर स्वाक्षऱ्या झाल्यावर दोन्ही पक्षांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. अमेरिकी फौजा अफगाणिस्तानमधून माघारी हटल्यानंतर तालिबान सशस्त्र संधर्ष सोडून देईल, असे या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील परदेशी सैनिकांच्या उपस्थितीवर तालिबानकडून तीव्र आक्षेप घेण्यात येत होता. आता अमेरिकन सैनिकांच्या माघारीच्या तयारीवरूनच हा करार झाला आहे.

करार झाल्यानंतर पहिल्या १३५ दिवसांत अमेरि्का आणि इतर देश आपल्या ८ हजार ६०० सैनिकांना माघारी बोलावतील. त्यानंतर पुढील १४ महिन्यांत सर्व अमेरिकी सैनिक मायदेशी परततील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार करताना सत्तेत आल्यावर अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेल्या अमेरिकी सैनिकांना माघारी बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यांच्या या आश्वासनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबाही मिळाला होता. ट्रम्य यांनी नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यावेळीही अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैनिकांच्या माघारीचा पुनरुच्चार केला होता. 

संबंधित बातम्या

अमेरिका - तालिबान चर्चा भारतासाठीही महत्त्वाची!

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी वाया गेले नाहीत; 'असा' आहे भारताचा जागतिक प्लॅन

अफगाणिस्तानमध्ये एअरस्ट्राईक; इसिसच्या दहशतवाद्यांऐवजी 30 शेतकरी ठार

अमेरिका आणि तालिबान यांच्यात गेले १९ महिने चाललेल्या चर्चेनंतर हा करार झाला आहे. एकीकडे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो दोडा येथे झालेल्या करार प्रक्रियेमध्ये उपस्थित होते. तर अमेरिकेच संरक्षणमंत्री मार्क एस्पर आणि नाटोचे महासचिव जेन्स् स्टोलटेनबर्ग काबूल येथे उपस्थित होते.

 

टॅग्स :United StatesअमेरिकाAfghanistanअफगाणिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय