शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 19:05 IST

America President Donald Trump: इस्रायलने खामेनी यांना मारण्याची योजना आखली होती. परंतु, मीच त्या योजनेला नकार दिला. एका भयानक मृत्यूपासून त्यांना वाचवले आणि यासाठी मला धन्यवाद देण्याची गरज नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

America President Donald Trump: युक्रेन-रशिया युद्ध, भारत पाकिस्तान लष्करी संघर्ष आणि आता इराणइस्रायल संघर्ष. तिन्ही ठिकाणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करताना दिसले. इराण आणि इस्रायलमधील युद्धविरामानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर बदलले. अमेरिका आता इराणच्या नागरी ऊर्जा अणुकार्यक्रमासाठी २० ते ३० अब्ज डॉलर्सची मदत करणार आहे. शिवाय, त्यावर लादलेल्या निर्बंधांमध्येही सवलत देऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. परंतु, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे प्रमुख खामेनी यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. 

ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया खामेनी यांच्या एका विधानानंतर आली. इराणने अमेरिका आणि इस्रायलला योग्य उत्तर दिले आहे आणि हे युद्ध जिंकले आहे. कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला करून तेहरानने अमेरिकेच्या तोंडावर चपराक लगावली. यावर, ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, १२ दिवसांच्या इस्रायल आणि अमेरिकन हल्ल्यांमुळे इराणच्या तीन प्रमुख अणुस्थळांचे गंभीर नुकसान झाले. तुम्ही देशातील एक धार्मिक आणि आदरणीय व्यक्ती आहात. तुम्हाला सत्य बोलावे लागेल. आता तुम्ही नरकात पोहोचला आहात, असे ट्रम्प यांनी खामेनी यांना उद्देशून बोलल्याचे म्हटले जात आहे. 

तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला

ते वास्तवापासून दूर जात आहे. तुमचा वाईट पद्धतीने पराभव झाला आहे, असे सांगत ट्रम्प यांनी एक मोठा खुलासा केला. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात इस्रायलने एक योजना आखली होती, ज्यामध्ये खामेनी यांना हल्ल्यात ठार करण्यात येणार होते. पण मी स्वतः त्या योजनेला नकार दिला. कारण मला माहिती होते की, खामेनी कुठे लपले आहेत. मी मुद्दाम असे होऊ दिला नाही. मी त्यांना एका अतिशय भयानक आणि अपमानास्पद मृत्यूपासून वाचवले. यासाठी त्यांनी मला 'धन्यवाद' देण्याची गरज नाही, असा टोला ट्रम्प यांनी लगावला. 

दरम्यान, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी म्हटले होते की, आम्ही इराणला अण्वस्त्रे आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करू देणार नाही. जर खामेनी आमच्या टार्गेटवर आले असते, तर आम्ही त्यांना नक्की मारले असते. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले होते. इस्रायलने अमेरिकेकडून परवानगी घेतली आहे का? विचारले असता काट्झ म्हणाले की, या गोष्टींसाठी आम्हाला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायल