शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

ट्रम्प आणि ओबामा 2028 मध्ये आमने-सामने येणार? अमेरिकन राजकारणात चर्चेला उधाण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 22:22 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने 2028 च्या निवडणुकीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

America Politics: डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्ते आल्यापासून अमेरिकेतून दररोज नवनवीन बातमी समोर येत आहे. आता अमेरिकेच्या राजकारणात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि बराक ओबामा 2028 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे राहतील का? अशी चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू होण्याचे कारण म्हणजे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आलेला एक प्रश्न!

ट्रम्प यांना विचारण्यात आले की, त्यांना बराक ओबामा यांच्याविरोधात निवडणूक लढवायला आवडेल का? यावर ट्रम्प यांनी हसत उत्तर दिले, 'मला मजा येईल!' त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, आता 2028 ची निवडणूक ट्रम्प विरुद्ध ओबामा यांच्यात ऐतिहासिक लढत ठरू शकते का, अशी अटकळ बांधली जात आहे.

ओबामांच्या संभाव्य पुनरागमनावर चर्चाबराक ओबामा 2008 आणि 2012, सलग दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिले आहेत. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी कमला हॅरिस यांच्यासाठी पडद्यामागून एक धोरणात्मक भूमिका बजावली होती.

आधी अशीही चर्चा सुरू होती की, त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची आहे, बायडेन यांच्या माघारीनंतर कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाने उमेदवारी दिली. पण, ट्रम्प यांनी त्यांचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा अमेरिकेची सत्ता काबीज केली. आता प्रश्न असा आहे की, ट्रम्प तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर ओबामा त्यांचा सामना करतील का?

ट्रम्प यांच्या या विधानाने चर्चेला उधाण डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच संविधानाच्या 22 व्या दुरुस्तीवर प्रश्न उपस्थित केले होते. यानुसार, अमेरिकेत कोणत्याही व्यक्तीला दोनपेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्ष होता येत नाही. यावर ट्रम्प म्हणाले होते की, 'लोक म्हणतात की, यात काही मार्ग आहेत, पण मी अजून यावर फारसा विचार केलेला नाही.' या विधानानंतर 2028 मध्ये तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी ट्रम्प यांना काही कायदेशीर मार्ग सापडू शकतो, अशी अटकळ सुरू झाली आहे. जर ही दुरुस्ती अथवा बदल केला गेला, तर बराक ओबामा यांचाही तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

ट्रम्प विरुद्ध ओबामा 2028 मध्ये ट्रम्प आणि ओबामा यांच्यात लढत झाली, तर ती अमेरिकन राजकारणाच्या इतिहासातील सर्वात मोठी निवडणूक लढत ठरू शकते. ट्रम्प आणि ओबामा हे दोघेही अत्यंत लोकप्रिय नेते आहेत, ज्यांना त्यांच्या कट्टर समर्थकांचा मजबूत आधार आहे.

ट्रम्प यांचा प्रवास

2016: हिलरी क्लिंटन यांचा पराभव करुन पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले.2020: जो बायडेन यांच्याकडून पराभव झाला.2024: कमला हॅरिसचा पराभव करून पुन्हा राष्ट्रपती बनले.

ओबामा यांचा प्रवास2008: जॉन मॅककेन यांचा पराभव करुन अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.2012: मिट रोमनी यांचा पराभव करुन दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले.2016-2024: सक्रिय राजकारणापासून दूर राहिले, परंतु डेमोक्रॅटिक पक्षात प्रभाव राखला.

अमेरिकेचे राजकारण बदलणार?ट्रम्प आणि ओबामा दोघांनीही तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी घटनात्मक बदलाची शक्यता तपासली, तर ते अमेरिकेचे राजकीय परिदृश्य पूर्णपणे बदलू शकते. रशियामध्ये व्लादिमीर पुतिन आणि चीनमध्ये शी जिनपिंग यांनी घटनात्मक दुरुस्त्या करून अमर्याद कार्यकाळाची व्यवस्था केली आहे. भारतामध्येही निवडणूक लढवण्यासाठी संविधानात वयोमर्यादा आखून दिलेली नाही. 

दरम्यान, शांततापूर्ण सत्ता हस्तांतरणाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल अमेरिकेने नेहमीच अभिमान बाळगला आहे. परंतु जर ट्रम्प आणि ओबामा 2028 मध्ये एकमेकांना सामोरे गेले, तर ते अमेरिकन लोकशाहीसाठी एक नवीन युग ठरू शकते. आता ही फक्त चर्चाच राहणार की, यात काही बदल होणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पPoliticsराजकारण