शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस घेण्यास नकार; 'या' कंपनीने तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना दाखवला थेट घरचा रस्ता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 12:54 IST

नॉर्थवेल हेल्थमध्ये सुमारे 76 हजार कर्मचारी काम करतात. त्यांपैकी 1400 जणांना काढून टाकण्यात आले आहे. तर इतर सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.

कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी कोरोना लस हेच जगातील सर्वात प्रभावी शस्त्र आहे. साधारणपणे जगातील सर्वच देशांत कोरोना लसीकरणाचे कार्यक्रम सुरू आहेत. मात्र, अद्यापही काही लोक असे आहेत, जे या लसींवर संशय घेत आहेत. अथवा, इतर कुण्या कारणांमुळे लस घेण्याची त्यांची इच्छा नाही. अमेरिकेतही असे प्रकार घडत आहेत. यामुळे येथील एका कंपनीने तब्बल 1400 लोकांना नोकरीवरून काढून टाकले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हे प्रकरण न्यूयॉर्क स्टेटमधील सर्वात मोठ्या हेल्थकेअर प्रोव्हायडर नॉर्थवेल हेल्थशी (Northwell Health) संबंधित आहे. त्यांनी कोरोना लस घेण्यास नकार देणाऱ्या तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून घरी बसवले आहे. हेल्थकेअरचे प्रवक्ता जो केम्प यांनी यासंदर्भात माहिती सार्वजनिक केली आहे.

नॉर्थवेल हेल्थमध्ये 76 हजार कर्मचारी काम करतात -न्यूयॉर्कमधील नॉर्थवेल हेल्थमध्ये सुमारे 76 हजार कर्मचारी काम करतात. त्यांपैकी 1400 जणांना काढून टाकण्यात आले आहे. तर इतर सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.

न्यूयॉर्कमध्ये सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅलिफोर्नियासह काही इतर राज्यांनीही, असा नियम बनवला आहे. परंतु, नॉर्थवेल हेल्थच्या या कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार दिल्याने, त्यांच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली. नॉर्थवेल हेल्थने येथे काम करणाऱ्या सर्व क्लिनिकल आणि नॉन-क्लिनिकल स्टाफसाठी कोरोना लस अनिवार्य केली होती. केम्पने म्हटले आहे, की आमचे लक्ष कर्मचाऱ्यांना काढून टाकणे नव्हते, तर प्रत्येकाला कोरोना लस देण्याचे होते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाEmployeeकर्मचारी