शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

30 सेकंद, 30 बॉम्ब अन् 30 नेत्यांचा मृत्यू..; असा झाला अयातुल्ला अली खामेनेई यांचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 12:50 IST

America-Israel-Iran Conflict: खामेनेई यांच्यासह कुटुंबातील सर्वांचा मृत्यू ?

America-Israel-Iran Conflict:इराणवरअमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे मोठा लष्करी हल्ला केला, ज्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये करण्यात येतोय.

30 सेकंदांत 3 शहरांवर हल्ले?

मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी झालेल्या या हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात अवघ्या 30 सेकंदांत इराणमधील 3 महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये सुमारे 30 वरिष्ठ राजकीय आणि लष्करी नेत्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे, या संपूर्ण कारवाईत ‘30’ हा आकडा वारंवार समोर येत आहे. 30 सेकंद, 30 ठिकाणे, 30 नेते अन् 30 बॉम्ब.

खामेनेईंच्या कंपाउंडवर 30 बॉम्ब टाकले?

अमेरिका-इस्रायलने थेट खामेनेई ज्या ठिकाणी राहत होते, त्याच ठिकाणाला लक्ष्य केले. काही रिपोर्ट्सनुसार, खामेनेईंच्या ठिकाणावर सुमारे 30 शक्तिशाली बॉम्ब टाकण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला.

उत्तराधिकारी मानल्या जाणाऱ्या मुलाचाही मृत्यू?

द टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात खामेनेई यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांचाही मृत्यू झाल्याचा दावा आहे. मोजतबा यांना खामेनेई यांचा संभाव्य उत्तराधिकारी मानले जात होते. याशिवाय, खामेनेई यांची मुलगी, नातू, जावई आणि सून यांचाही मृत्यू झाल्याचे काही माध्यमांचे म्हणणे आहे.

मृत्यूपूर्वी वरिष्ठ नेत्यांशी भेट?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्ल्याच्या काही वेळ आधी खामेनेई यांनी अली शमखानी (वरिष्ठ सुरक्षा सल्लागार), अली लारीजानी (सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव) यांची एका सुरक्षित ठिकाणी भेट घेतली होती.

GBU-28 बंकर बस्टर बॉम्बचा वापर?

तज्ञांच्या मते, या हल्ल्यात GBU-28 लेझर गाईडेड बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आल्याची शक्यता आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, इस्रायली F-15I लढाऊ विमानांनी खामेनेईंच्या कॉम्प्लेक्सवर एकूण 30 बॉम्ब टाकले.

GBU-28 बॉम्बची वैशिष्ट्ये:

वजन: सुमारे 2268 किलो

लांबी: सुमारे 19 फूट

20-30 फूट जाड काँक्रीट भेदण्याची क्षमता

खोल अंडरग्राउंड बंकर उद्ध्वस्त करण्यासाठी डिझाइन

एकाच विमानातून 30 बॉम्ब शक्य?

लष्करी तज्ज्ञांच्या मते, एकही विमान 30 GBU-28 बॉम्ब वाहू शकत नाही. एका F-15 विमानात साधारणतः 1 ते 2 बॉम्ब नेले जातात. त्यामुळे हा हल्ला करण्यासाठी 15 ते 20 इस्रायली लढाऊ विमाने सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Khamenei Dead? 30 Second Attack, 30 Bombs, 30 Leaders

Web Summary : Reports claim a US-Israeli strike killed Iran's Khamenei and family. The alleged 30-second attack targeted three cities, killing 30 leaders. Some reports suggest 30 bombs hit Khamenei's compound, possibly using GBU-28 bunker busters. His son was also reportedly killed.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायलAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेई